नवी दिल्ली, 08 डिसेंबर : काळं मीठ हिमालयन सॉल्ट या नावानेही ओळखलं जातं. हे मीठ मुख्यतः भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ इथल्या हिमालयाच्या आसपासच्या काही ठिकाणांच्या खाणींमध्ये आढळतो. शेकडो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये काळ्या मीठाचा उपयोग केला जातो. काळ्या मीठात मोठ्या प्रमाणात खनिज पदार्थ असतात. त्याचा उपयोग स्वयंपाकातही केला जातो. यात वॉल्केनिक ऑरिजन असल्याने सल्फर कॉम्पोनेंट जास्त असतात. त्यामुळेच याला एक वेगळा वास आणि चव असते. यात आयर्न और पोटॅशियम क्लोराईडचही प्रमाण चांगलं असतं त्यामुळे शरीराला फायदेशीर आहे.
पोषक घटक
त्यात अँटिऑक्सिडेंट घटक असतात आणि ज्यामध्ये सामान्य मीठाच्या तुलनेत सोडियमची पातळी खूप कमी असते. या व्यतिरिक्त, त्यात लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी बरीच खनिजं असतात, जी आपल्या निरोगी शरीरासाठी खूप महत्वाची आहेत.
हृदयात जळजळ आणि गुठळ्या
काळं मीठ यकृतातल्या पित्ताच्या उत्पादनला कंट्रोल करतं. ज्यामुळे हृदयातील जळजळ आणि गुठळ्यांचीसमस्या दूर होण्यास मदत होते. तर, शरीरातील ऍसिड तयार होण्याच्या प्रकृतीवर नियंत्रण करते आणि जर आपल्याला पोटातल्या गॅसची समस्या असेल तर,एक चिमूटभर मीठ खाल्ल्याने त्वरित आराम मिळेल.
पाचन प्रणाली सुधारते
डायझेशनचा प्रॉब्लेम असलेल्यांसाठी कालं मीठ खूप उपयुक्त आहे. काळे मीठ यकृतातील पित्त तयार होण्यासला प्रतिबंध करतं आणि लहान आतड्यांमधील जीवनसत्त्वं शोषून घेण्यास मदत करतं,ज्यामुळे पचन क्रीया सुधारते. पोटात अनेकदा अपचनामुळे बरीच टॉक्सीन तयार होतात,काळ्या मीठामुळे पोटाच्या समस्येत फायदा होतो.
हृदयासाठी फायदेशीर काळं मीठ कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. ते नॅटरली ब्लड थिनर म्हणून काम करतं आणि रक्तदाब नियंत्रित करतं. पण, काळं मीठ 6 ग्रॅमपेक्षा जास्त न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी देतात. कारण, जास्त वापरामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास देखील होऊ शकतो.
मधुमेहासाठी फायदेशीर
एखाद्या व्यक्तीने दररोज कमी प्रमाणात काळं खाल्ल तर, रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, ब्लड ग्लूकोज फॉल झाला असेल तर, काळे मीठ थोड्या प्रमाणात उपयोगी पडतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Stomach