कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी
बस्ती, 27 मे : काही वर्षांपूर्वी 'ऑल इज वेल' चित्रपट आला होता, यामध्ये अभिनेता आमिर खान लोकांना समजावून सांगताना दिसला होता की पालकांनी किंवा नातेवाईकांनी मुलांवर त्यांची स्वप्ने लादू नयेत. पण या विचारसरणीच्या विरोधात समाज चालतोय, असे चित्र दिसतंय. पालक आणि नातेवाईक मुलांवर त्यांची स्वप्ने लादत आहेत. त्यामुळे मुले मानसिक आजाराला बळी पडत आहेत.
बस्ती जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील मानसिक रोग विभागाच्या ओपीडीमध्ये 15 ते 25 वर्षे वयाचे 4 ते 5 रुग्ण दररोज येत आहेत. हे सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अशा समस्यांना गांभीर्याने घेऊन आरोग्य तज्ञ त्यांच्या विशेष व्यवस्थापनाची शिफारस करतात.
स्पर्धा परिक्षेचा दबाव -
यावेळी अधिक तरुण रुग्ण येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ए. के. दुबे यांनी सांगितले. हे तरुण काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. नुकताच असा एक रुग्ण आला होता, जिचे वय 19 वर्षे होते. त्याला अस्वस्थता, जलद श्वासोच्छवास, बेहोशी अशा समस्या होत्या. कुटुंबीयांनी सर्व चौकशी केली. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. मग त्यांनी मुलीला माझ्याकडे आणले आणि जेव्हा मी तिच्याशी बोललो तेव्हा मला कळले की ती NEET ची तयारी करत आहे.
घरच्यांना तिला डॉक्टर बनवायचे आहे, नातेवाईक आले तरी तेच सांगतात. या सगळ्यामुळे मुलगी खूप दडपणाखाली होती. ती डिप्रेशनची शिकार झाली होती. डॉ. दुबे यांनी सांगितले की, जेव्हा मी तिची टेस्ट केली, तेव्हा कळले की ती अभ्यासात खूप कमजोर आहे, त्यानंतर मी रुग्णाच्या कुटुंबीयांना हे सांगितले. औषधोपचाराने ती दोन महिन्यांत बरी झाली.
डॉ. ए.के. दुबे यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्यांनी स्वतः मुलांच्या क्षमतेचे मूल्यांकन करू नये. त्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा द्यावी. यासाठी कुटुंबातील सदस्यांनी मुलाच्या शिक्षकाबरोबरच मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून मुलांच्या मानसिक क्षमतेचे मूल्यांकन करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Local18, Mental health, Uttar pradesh