लंडन, 23 मार्च : प्रत्येक व्यक्तीने रोज किमान दोन लिटर पाणी प्यावं, असा सल्ला दिला जातो. पाणी प्यायल्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार बनते आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं, असं म्हणतात. जेव्हा जास्त पाणी प्यायलं जातं, तेव्हा जास्त वेळा लघवीला जावं लागणं साहजिक आहे. जेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळतं, तेव्हा शरीर लघवीच्या स्वरूपात शरीरातले सर्व विषारी पदार्थ काढून टाकतं; पण कोणी भरपूर पाणी प्यायलं तरी त्याला लघवीला जावंसं वाटत नसेल तर? असाच काहीसा प्रकार लंडनमध्ये राहणाऱ्या 30 वर्षांच्या एल्ली अॅडम्सच्या बाबतीत घडला.
एल्ली गेल्या चौदा महिन्यांपासून मूत्रविसर्जन करू शकलेली नाही. बाथरूममध्ये जाऊन मोकळं व्हावं, असं तिला अनेकदा वाटतं; पण तिला इच्छा असूनही मूत्रविसर्जन करता येत नाही. आता 14 महिन्यांनंतर तिला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा तिला एक अत्यंत दुर्मीळ आजार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या दुर्मिळ आजारामुळे तिला लघवी होत नाही.
जिथं पाय ठेवला तिथं हिरवळ; 'पीपल बाबा'मुळे उगवली तब्बल 2 कोटी झाडं
एल्लीने तिची कहाणी डेली स्टोरशी शेअर केली. ती म्हणाली, `ऑक्टोबर 2020मध्ये एके दिवशी अचानक सकाळी मी झोपेतून उठले. रात्रीपर्यंत सर्व काही नॉर्मल होतं; पण जेव्हा मी सकाळी लघवीला गेले तेव्हा ती होत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी खूप प्रयत्न करूनही मूत्रविसर्जन होत नव्हतं. त्यामुळे मी भरपूर पाणी प्यायले. तरीदेखील स्थिती कायम राहिली. त्यानंतर मी रुग्णालयात गेले. माझ्या मूत्राशयात एक लिटर युरिन अडकून पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी मला इमर्जन्सी कॅथेटर लावलं.`
एल्ली म्हणाली, `जे काम पूर्वी मला सहजसोपं वाटायचं ते आता अवघड बनलं आहे. डॉक्टरांनी मला सेल्फ कॅथेराइज कसं करायचं हे शिकवलं आहे. ती उपकरणांशिवाय लघवी करू शकत नाही.` या घटनेला आठ महिने झाल्यानंतर जेव्हा एल्ली पुन्हा युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये गेली तेव्हा तिला फॉलर सिंड्रोम असल्याचं निदान झालं.
आश्चर्य! छोट्याशा बाटलीतील पाण्याचा चमत्कार; कॅन्सरसह अनेक आजारांचे रुग्ण ठणठणीत झाल्याचा दावा
अनेक महिलांना हा आजार वीस किंवा तीस वर्षं वयादरम्यान होतो. या अनुषंगाने एल्लीच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. त्यातून ती कॅथेटरशिवाय मूत्रविसर्जन करू शकणार नाही, असं स्पष्ट झालं; मात्र एक शस्त्रक्रिया करून घेऊन एल्लीने काही काळासाठी कॅथेटरपासून स्वातंत्र्य मिळवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Serious diseases, Water