मुंबई, 12 जुलै : पावसाळा सुरू होताच वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लेप्टोस्पारियस या आजाराची अनेकांना लागण झाली होती. ठाण्यातील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईकरांमध्ये या आजाराबाबत भीतीचं वातावरण आहे. लेप्टोस्पारियसची लागण कुणाला होऊ शकते? या आजारात काय काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंबईतील डॉक्टर निखिल वर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’ साचलेल्या पाण्याच्या जवळ राहणाऱ्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. हा आजार ‘स्पायरोचेट’ नावाच्या जीवाणूंमुळे होतो. जेव्हा मनुष्य जीवाणू संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात येतो, विशेषत: उंदीर, पाणी, माती किंवा संक्रमित मूत्राने दूषित अन्न यांच्या संपर्कात येतो. उंदरांच्या लघवीने प्रदूषित झालेल्या पावसाच्या पाण्यात हे विषाणू असतात. ते आपल्याला जखम असल्यास त्या वाटे हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे प्राण्यांचे मूत्र देखील तुम्हाला आजारी बनवू शकते,’ त्यामुळे विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. वर्गे यांनी दिलाय.
‘या’ गोष्टी टाळा या विषाणूमुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते. पुराच्या पाण्यात किंवा इतर पाण्यात पोहणे टाळा. तुम्हाला जखम झाली असल्यास संरक्षणात्मक कपडे घाला. जखम झालेल्या भागाला वॉटरप्रूफ पट्टीनं बांधून घ्यावा. पाणी उकळून किंवा योग्य रासायनिक प्रक्रिया करुन प्यावे. पावसाळ्यात किड्यांपासून वाचण्यासाठी भन्नाट उपाय, ‘या’ 4 टिप्स आणि काम खल्लास काय आहेत लक्षणं? जिवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर ताप येणे, थंडी वाजणे अशी लक्षणे आढळून येतात. हा आजार झालाय याची खात्री करण्यासाठी टेस्ट महत्त्वाची आहे. हा आजार तीन आठवडे किंवा त्याहून जास्त काळ टिकतो, अशी माहिती डॉक्टर वर्गे यांनी दिली. काय काळजी घ्याल? दुषित पाण्याचा संपर्क टाळावा. काही अपरिहार्य कारणामुळे हा संपर्क होत असल्यास हातमोजे आणि गमबूट वापरावेत. त्यानंतर हात आणि पाय साबनानं धुवावेत. दुषित पाण्यात उगवलेल्या पालेभाज्या चांगल्या प्रकारे धुवावेत. अवयवांच्या जखमांवर अँटीबॅक्टेरियल क्रीम लावावे. उरलेले शिळे अन्न उघड्यावर फेकण्याऐवजी बंद डस्टबिनमध्ये टाकावे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. त्यामुळे उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भाव टाळता येईल, असा सल्ला डॉ. वर्गे यांनी दिलाय.