वाढतं वजन आणि लठ्ठपणाच्या समस्येमुळे हृदयविकार, डायबेटीससह गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे आजार टाळण्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी पोषक आहार आणि व्यायामाकडे अनेकांचा कल वाढला आहे. बरेच जण डाएटच्या माध्यमातून वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात. साखरयुक्त किंवा गोड पदार्थांचं सेवन बंद करतात. तरुणाईमध्ये कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंकची मोठी क्रेझ आहे; पण त्यातही शुगर फ्री ड्रिंक्सकडे बहुतांश तरुणांचा कल दिसतो. डाएट कोक हे त्यापैकीच होय; पण डाएट कोकमधला मुख्य घटक कॅन्सर अर्थात कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. हा घटक नेमका कोणता, त्याचे दुष्परिणाम कसे होतात ते सविस्तर जाणून घेऊ या. वजन नियंत्रणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती डाएट कोक पितात. हे पेय आरोग्यदायी मानलं जातं; पण त्यातल्या एका महत्त्वाच्या घटकाबाबत नुकत्याच आलेल्या अहवालाने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. डाएट कोकमधला महत्त्वाचा घटक कार्सिनोजेन म्हणून सूचीबद्ध करणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ अॅस्पार्टेम या घटकाला मानवासाठी संभाव्य कार्सोनोजनिक असं लेबल देणार आहे. याचा अर्थ अॅस्पार्टेमचा कॅन्सरशी संबंध जोडणारे पुरावे त्यांच्याकडे आहेत; पण ते मर्यादित आहेत. याशिवाय कॅन्सरसाठी कारणीभूत घटकांची यादी करण्याकरिता ‘मानवासाठी कदाचित कार्सिनोजेनिक’ आणि ‘मानवासाठी कार्सिनोजेनिक’ अशा दोन श्रेणी अस्तित्वात आहेत.
अॅस्पार्टेम हा जगातल्या कृत्रिम गोड पदार्थांपैकी एक पदार्थ आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हा पदार्थ पुढच्या महिन्यात संभाव्य कार्सिनोजेन म्हणून घोषित केला जाण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओची कॅन्सर शाखा असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या (आयएआरसी) स्रोताचा हवाला देऊन या वृत्तात असं म्हटलं आहे, की ही सूची जुलैमध्ये प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. अॅस्पार्टेम हा घटक डाएट कोक, आइस्क्रीम, च्युइंग-गम, डाएट सोडा, शुगर फ्री सोडा, लो कॅलरी कॉफी स्वीटनर, पुडिंग्ज, शुगरफ्री मिष्टान्न, शुगरफ्री जॅम आदी कमी गोड किंवा शुगर फ्री पदार्थांमध्ये वापरला जातो. ‘चायनीज इन्स्टिट्यूट ऑफ फूड’चे सदस्य ली शुगुआंग यांनी ‘इकॉनॉमिक व्ह्यू’शी बोलताना सांगितलं, की डब्ल्यूएचओने अॅस्पार्टेमला कार्सिनोजेनिक म्हणून सूचीबद्ध केल्यास पेय कंपन्यांवर फारसा परिणाम होणार नाही. ते सुक्रालोज आणि स्टीव्हियासारखे इतर अनेक गोड पदार्थ शुगर-फ्री पेयांसाठी वापरू शकतात. डब्ल्यूएचओ आणि फूड अॅडिटीव्ह्ज ऑन फूड अॅड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची एक्सपर्ट कमिटी ऑन फूड अॅडिटिव्ह्ज अर्थात जेईसीएफए ही डब्ल्यूएचओची फूड अॅडिटिव्ह्जवरची तज्ज्ञ समिती आहे. त्यांच्या माहितीनुसार, 60 किलो वजनाच्या प्रौढ व्यक्तीला 12 कॅनपेक्षा जास्त डाएट सोडा पिणं धोकादायक ठरू शकतं. एनव्हायर्न्मेंटल हेल्थ जर्नलमध्ये 2021मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात असं लिहिलं आहे, की 5000हून अधिक उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अॅस्पार्टेममुळे उंदरांच्या अनेक अवयवांमध्ये घातक ट्यूमर तयार झाले. स्वीकारण्यायोग्य दैनिक सेवनाजवळ येणाऱ्या कमी एक्सपोजरच्या पातळीवरही कॅन्सरचा धोका वाढलेला दिसून आला. प्रसूतिपूर्व एक्सपोजरमुळे कमी डोसमध्ये प्रौढांच्या तुलनेत उंदराच्या पिलांमध्ये घातक रोग वाढल्याचं दिसून आलं. Monsoon Tips : पावसाळ्यासाठी रेनकोट खरेदी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नंतर पस्तावाल यापूर्वी रात्रभर काम करणं, लाल मांस खाणं आणि मोबाइल फोन वापरणं या गोष्टी डब्ल्यूएचओच्या ‘आयएआरसी’ने कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींच्या यादी समाविष्ट केल्या होत्या. अॅस्पार्टेमसंदर्भातला निर्णय 14 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, असं ‘द गार्डियन’च्या वृत्तात म्हटलं आहे. आयएआरसी- डब्ल्यूएचओच्या कार्सिनोजेन्सच्या वर्गीकरणात तीन गट आहेत. त्यात गट 1 मध्ये मानवासाठी कार्सिनोजेनिक, गट 2Aमध्ये मानवासाठी कदाचित कार्सिनोजेनिक, गट 2Bमध्ये मानवासाठी कार्सिनोजेनिक असण्याची शक्यता आणि गट 3 मध्ये मानवासाठी कर्करोगजन्यतेनुसार वर्गीकृत नाही असे घटक समाविष्ट आहेत. अॅस्पार्टेम हा गट 2A अंतर्गत आहे. याचा अर्थ प्रयोगशाळेत प्राण्यांमध्ये यातला घटक कॅन्सरसाठी कारणीभूत असल्याचा खात्रीलायक पुरावा आहे; मात्र काही पुरावे असे आहेत की यामुळे मानवाला कॅन्सर होऊ शकतो याबाबत मानवात पुरावा निर्णायक नाही. अॅस्पार्टेमवर डब्ल्यूएचओच्या निर्णयावरच्या वृत्तांमुळे उत्पादक आणि ग्राहक दोघेही चिंतेत आहेत. फक्त गोड पदार्थांचीच आपल्याला काळजी वाटली पाहिजे का? मे 2023मध्ये डब्ल्यूएचओने नॉन शुगर स्वीटर्नसवर (एनएसएस) नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. ती शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा असंसर्गजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी एनएसएसच्या वापराविरुद्ध शिफारस करतात. या अहवालात अनहेल्दी वजन कमी करणं, कृत्रिम गोड पदार्थांची वाढती लोकप्रियता आणि डायबेटीस टाइप-2, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचा धोका या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. Health Tips : डायबिटीजच्या रुग्णांनी पावसाळ्यात घ्या 7 गोष्टींची काळजी, अन्यथा धोका वाढलाच म्हणून समजा याबद्दल गुरुग्रामच्या सी. के. बिर्ला रुग्णालयातल्या द ऑन्कोलॉजी सेंटरचे संचालक डॉ. विनय गायकवाड म्हणाले, `संभाव्य कार्सिनोजेन म्हणून त्याचं वर्गीकरण केलं आहे, याचा अर्थ ते कार्सिनोजेनिक आहे असा नाही. हा घटक कॅन्सरसाठी कारणीभूत आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी पुढचं संशोधन केलं जात आहे. फ्रान्स आणि इटलीसारख्या युरोपीय देशांतल्या अभ्यासात दिसून आलं आहे, की विशिष्ट व्यक्ती अन्न आणि पेयांमध्ये अॅस्पार्टेमचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात त्यांना कॅन्सरचा धोका थोडा जास्त असतो; पण आम्ही अद्याप ते सत्य म्हणून स्थापित करू शकत नाही; पण या बाबतीत आत्तापासून सावध व्हायला हवं. बातम्या आणि घडामोडींवर लक्ष ठेवावं लागेल. सिगारेटच्या धुरासारख्या गोष्टी अद्याप स्थापित करणं बाकी आहे. आपल्याला माहिती आहे, की त्यामुळे कॅन्सर होतो. लाल मांस हादेखील या संपूर्ण मोहिमेचा भाग आहे. तसंच अॅस्बेस्टॉस हे रसायन कॅन्सरचा धोका वाढवणारं असल्याचं सिद्ध झाले आहे. अॅस्पार्टेम त्यापैकीच एक आहे.` दुसरीकडे अनेक तज्ज्ञांनी याला विरोध केला आहे. `डब्ल्यूएचओच्या मते अॅस्पार्टेम हे कोरफड, लोणच्या इतकेच कार्सिनोजेनिक आहे. लाल मांस खाणं, गरम पेय पिणं किंवा हेअरड्रेसर असणं या तुलनेत कमी कार्सिनोजेनिक आहे,` असं ट्विट जेम्स वोंग या विज्ञान लेखकाने केलं आहे. मानवी पुरावे उपलब्ध नसल्याने अॅस्पार्टेम हे कार्सिनोजेनिक आहे की नाही, असा सवालही तज्ज्ञांनी केला आहे.