जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips: काय असतो गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल? आजार होण्यामागे मूळ कारणे काय?

Health Tips: काय असतो गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल? आजार होण्यामागे मूळ कारणे काय?

Health Tips: काय असतो गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल? आजार होण्यामागे मूळ कारणे काय?

Health Tips: काय असतो गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल? आजार होण्यामागे मूळ कारणे काय?

Health Tips: सध्या वाढत असलेल्या हृदयविकारास कोलेस्ट्रॉल कारणीभूत आहे. पाहा काय आहेत लक्षणे?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

 पुणे, 8 जुलै: कोलेस्ट्रॉल हा हृदयाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. तुमच्या बहुतांश हृदयविकारांचे प्रमुख कारण उच्च कोलेस्ट्रॉल आहे. चला जाणून घेऊया उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? उच्च किंवा कमी कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत? कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? याबाबत पुणे येथील डॉ. अविनाश भोंडवे यांनी आपल्याला अधिक माहिती दिली आहे. काय आहे कोलेस्ट्रॉल? “कोलेस्टेरॉल हा एक चरबीसारखा पदार्थ आहे. जो यकृताद्वारे तयार होतो जो पचन, व्हिटॅमिन डी, सेल झिल्ली आणि काही हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. कोलेस्टेरॉल विरघळत नाही, म्हणून ते स्वतःहून इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी लिपोप्रोटीन्स नावाचा कण लागतो जो कोलेस्टेरॉल रक्ताद्वारे इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो,” असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) “कमी घनतेच्या लिपोप्रोटीनला वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते आणि यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका इत्यादीसारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात” असे अविनाश भोंडवे सांगतात. उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) उच्च घनता लिपोप्रोटिन्स बद्द्ल माहिती देताना डॉक्टर सांगतात, “उच्च घनतेच्या लिपोप्रोटीनला चांगले कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. ते यकृतामध्ये कोलेस्टेरॉल परत करण्यास मदत करते, जेणेकरून ते काढून टाकले जाऊ शकते. टोटल कोलेस्ट्रॉल हे साधारणतः 200 पेक्षा कमी असायला पाहिजे. ज्यांना हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असे आजार आहेत अशांना तर ते 150 च्या दरम्यान असणं चांगलं असतं. गुड कोलेस्ट्रॉल हे 35 ते 40 च्या वर असावं लागतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे सुद्धा 100 ते 130 च्या दरम्यान असावं लागतं”. कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं महत्त्वाचं कारण अनुवंशिकता असते. जर तुमच्या घरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा कौटुंबिक इतिहास असेल, तुमच्या आई-वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर निश्चितच तुमचं कोलेस्ट्रॉल जास्ती असू शकतं. दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण काही तेलकट पदार्थ, तेल, तूप किंवा चरबीयुक्त पदार्थ खातो ते गरजेपेक्षा जास्त असले तर त्याचा जो भाग आहे, तो कोलेस्ट्रॉलमध्ये जमा होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते, असं डॉक्टर सांगतात. सर्वच तेलांनी कोलेस्ट्रॉल वाढतं? सगळ्याच प्रकारचे तेल, तूप खाऊन कोलेस्ट्रॉल वाढतं असं नाही. तर जी सेक्युरॅटेड फॅटी ऍसिड्स असतात, अशा प्रकारचे पदार्थ हे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवतात. अशाने बॅड कोलेस्ट्रॉल वाढत जातो. बाजारामध्ये किंवा रस्त्यावर भजी समोसे असतात. त्यात वापरण्यात येणाऱ्या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड साठतात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याची शक्यता असते, असं डॉक्टर भोंडवे सांगतात. वजन वाढीचा कोलेस्ट्रॉलवर परिणाम तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे वजन वाढणे. हल्ली तरुण पिढीमध्ये थायरॉइड सारख्या समस्या उद्भवत आहेत. यामध्ये वजन वाढणे ही मोठी समस्या आहे. वजन वाढल्याने कोलेस्ट्रॉलवर परिणाम होऊ शकतो. सतत वजन वाढणे हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. म्हणजेच, जेव्हा तुमच्या शरीराचे वजन सामान्य असते आणि लठ्ठपणा अचानक वाढतो, तेव्हा उच्च कोलेस्टेरॉलचा धोका असतो. वाढत्या कोलेस्टेरॉलवर, सर्व प्रथम डॉक्टर वजन कमी करण्यास सांगतात आणि खाण्यापिण्याबाबत खबरदारी घेण्यास सांगतात. थोडक्यात बघायला गेलं तर अनुवंशिकता, सॅच्यु फॅटी ऍसिडचा आहारामध्ये समावेश, तेलकट, तुपकट खाणं ही कोलेस्ट्रॉल वाढीची कारणं आहेत. त्यात नियमित व्यायाम न करणे आणि थायरॉईड सारख्या समस्या उद्भवणे ही बॅड कोलेस्ट्रॉलची कारणे बनू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात