जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health : धुम्रपानाने बहिरे व्हाल! आम्ही नाही, तज्ज्ञ सांगतात...काळजी घ्या!

Health : धुम्रपानाने बहिरे व्हाल! आम्ही नाही, तज्ज्ञ सांगतात...काळजी घ्या!

 धुम्रपानाने बहिरे व्हाल! आम्ही नाही, तज्ज्ञ सांगतात...काळजी घ्या!

धुम्रपानाने बहिरे व्हाल! आम्ही नाही, तज्ज्ञ सांगतात...काळजी घ्या!

धूम्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांना वयाशी-संबंधित श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    आरोग्याच्या विविध गंभीर समस्यांसाठी धूम्रपान हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. गेल्या काही वर्षांत श्रवणक्षमता कमी होणं ही आणखी एक समस्या याच कारणामुळे होत असल्याचं आढळलं आहे. धूम्रपान आणि श्रवणशक्ती कमी होणं (बहिरेपण येणं) यांच्यातला संबंध सूचित करणारे पुरावे तज्ज्ञांनी शोधून काढले आहेत. बेंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट (कान, नाक आणि घसा) म्हणून कार्यरत असलेले डॉ. गिरीश राय यांनी त्याविषयी लिहिलेला हा लेख… विविध अभ्यासांमधून असं सूचित होतं, की धूम्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांना वयाशी-संबंधित श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते. 2018मध्ये असोसिएशन फॉर रिसर्च इन ऑटोलॅरिन्गोलॉजीच्या (जेएआरओ) जर्नलमधल्या एका अभ्यासात असं आढळलं, की धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका 1.69 पट जास्त असतो. अभ्यासात हेदेखील दिसून आलं, की धूम्रपानामध्ये डोस-रिस्पॉन्स संबंध आहे. याचा अर्थ असा आहे, की दररोज धूम्रपान केलेल्या सिगारेटची संख्या आणि धूम्रपानाचं प्रमाण आणि वारंवारिता यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका वाढतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    धूम्रपान आणि बहिरेपण येणं यांमधला दुवा : धूम्रपान आणि अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) प्रौढ आणि मुलं अशा दोन्ही घटकांची श्रवणशक्ती कमी होऊ शकते. धूम्रपानामुळे घसा आणि नाकाच्या ऊतींवर परिणाम होतो आणि रोगप्रतिकारशक्ती बिघडते. त्यामुळे रुग्णांना कानांवर परिणाम करणाऱ्या आजारांचा अधिक धोका निर्माण होतो. पॅसिव्ह स्मोकिंग लहान मुलांचं अधिक नुकसान करतो. ज्येष्ठ व्यक्ती आणि मुलांना इन्फेक्शन होणं सर्वसामान्य आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सेन्सरीन्यूरल प्रकारचं बहिरेपण सर्वाधिक (77.5 टक्के) आढळलं, तर मिश्र प्रकारचं बहिरेपण 18.3 टक्के होतं. धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये मिश्र प्रकारचं बहिरेपण अधिक असल्याचं आढळलं. धूम्रपानामुळे रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतात हे सर्वज्ञात आहे. बहिरेपणा येण्यासाठी कारणीभूत असलेला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे कॉक्लीयाला होणारा कमी रक्तपुरवठा. कॉक्लीया हा श्रवणक्रियेमध्ये कार्यरत असलेला संवेदनशील अवयव आहे. निकोटीन आणि कार्बन मोनॉक्साइड हे सिगारेटमधले विषारी घटक कानाच्या आतल्या केसांच्या पेशींचं आणखी नुकसान करू शकतात. हे केस सॉनिक कंपनांचं रूपांतर करतात आणि मेंदूला विद्युत सिग्नल देण्याचं काम करतात. हे सर्व घटक श्रवण प्रणालीच्या नैसर्गिक वृद्धत्वाच्या प्रक्रियेस गती देऊ शकतात. परिणामी, धूम्रपान करणार्‍यांची श्रवणशक्ती कमी वयातच घटते. Obesity In Kids : तुमची लहान मुलं लठ्ठ होत चाललीयेत? त्यांना द्या ‘असा’ आहार, जाणवेल परिणाम धूम्रपानाने श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या कशी टाळू शकता? श्रवणशक्ती कमी होणं आणि नियमित धूम्रपानामुळे आरोग्यावर होणारे इतर परिणाम रोखण्यासाठी धूम्रपान सोडणं हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. कोणताही वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णाला सर्वप्रथम हाच सल्ला देईल. धूम्रपान बंद केल्यानं ऐकण्याच्या क्षमतेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचं सिद्ध झालं आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान सोडतात त्यांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो. धूम्रपान सोडण्याव्यतिरिक्त, एखादी व्यक्ती मोठ्या आवाजाच्या संपर्कात येणं टाळून, मोठ्या आवाजाच्या संपर्कात असताना इअरप्लग घालून आणि नियमित श्रवणविषयक चाचण्या करून आपल्या कानाचं आरोग्य सुरक्षित राखू शकते. कान, नाक आणि घसा (ईएनटी) किंवा ओटोऱ्हायनोलॅरिन्गोलॉजी तज्ज्ञांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे. हे तज्ज्ञ कानांची सर्वसमावेशक तपासणी करतील व श्रवणदोषासाठी व्यक्तिनिहाय उपचार, तसंच धूम्रपान बंद करण्याबाबत सल्ला देतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात