उन्हाळ्यानंतर आता पावसाळी ऋतूला सुरुवात होत आहे. यादरम्यान हवामानात बदल झाल्याने ताप, सर्दी, खोकला, यासारखे आजार बळावतात. अनेकदा ताप आल्यावर आपण घरी क्रोसीन, पॅरेसिटॅमोलच्या गोळ्या घेतो. औषधी गोळ्यांमुळे आपल्याला आराम मिळतो मात्र त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तेव्हा काही घरगुती उपायांचा अवलंब करून देखील तुम्ही तापावर नियंत्रण मिळवू शकता. तेव्हा तापावर कोणते घरगुती आणि नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात हे जाणून घेऊयात. हळद : हळदीमुळे ताप, कफ, घशातील खवखव कमी करण्यास प्रभावी ठरते. हळदीमध्ये क्युरक्युमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. यामधील अॅन्टी व्हायरल आणि अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकार क्षमता सुधारण्यास मदत करतात. ग्लासभर गरम दूधात हळद मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. तसेच मीठ, हळद आणि मधाचं चाटण देखील टॅप घालवण्यासाठी उपयुक्त ठरू शकत.
तुळस : तुळशीची पानं चघळल्याने ताप कमी होण्यास मदत होते. तुळशीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, दाहशामक आणि इंफेक्शनशी सामना करण्याची क्षमता आहे. या आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे तुळस तापात शारीराला व्हायरल इंफेक्शनसोबत लढण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. आलं : आलं देखील हळदीप्रमाणेच अॅन्टी बॅक्टेरियल आहे. मधात बुडवलेला आल्याचा तुकडा चघळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे नैसर्गिकरित्या तापाशी सामना केला जाऊ शकतो. Health : एक महिना साखर खाण सोडलं तर काय होईल? शरीरात दिसतील 5 बदल, जाणून घ्या फायदे आणि तोटे लसूण : लसूण देखील तापावर प्रभावी ठरते. लसणामध्ये अॅन्टी टॉक्झिक, अॅन्टी फंगल, अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ताप कमी होण्यास मदत होते. २ ते 3 लसणाच्या पाकळ्या चघळल्यास ताप कमी होण्यास मदत होते. लसणामध्ये डायफोरेटिक गुणधर्म असल्याने घाम येतो आणि ताप कमी होण्यास मदत होते.