जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग रोज करा 5 योगासने, केसांशी संबंधित समस्या होतील दूर

केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग रोज करा 5 योगासने, केसांशी संबंधित समस्या होतील दूर

केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग रोज करा 5 योगासने

केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग रोज करा 5 योगासने

अनेकदा महिला या केस गळतीमुळे त्रस्त असतात. अनेक उपाय करून देखील त्यांची केस गळती थांबत नाही, त्यामुळे कमी वयात टक्कल पडणे, केस विरळ होणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवतात. तेव्हा तुम्हाला योगाचे 5 प्रकार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती थांबू शकते आणि तुम्ही तणावमुक्त देखील राहू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

योगा केल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि शारीरिक ताकद टिकवून ठेवण्यास मदत होतेच, पण त्यासोबतच योगाचे काही प्रकार तुमचे केस मजबूत ठेवण्यासाठी देखील प्रभावी ठरतात. अनेकदा महिला आणि पुरुष  केस गळतीमुळे त्रस्त असतात. अनेक उपाय करून देखील त्यांची केस गळती थांबत नाही, त्यामुळे कमी वयात टक्कल पडणे, केस विरळ होणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवतात. तेव्हा तुम्हाला योगाचे 5 प्रकार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती थांबू शकते आणि तुम्ही तणावमुक्त देखील राहू शकता. शीर्षासन:

News18

वास्तविक, जेव्हा तुम्ही शीर्षासन करता तेव्हा या आसनात डोक्यात रक्ताचा प्रवाह वेगाने वाढतो. त्यामुळे केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. या योगामध्ये डोके सरळ जमिनीवर आणि संपूर्ण शरीर आकाशाकडे सरळ रेषेत ठेवावे लागते. सर्वांगासन :

News18

शीर्षासनाप्रमाणेच सर्वांगासनाच्या आसनात डोक्यातील रक्ताभिसरण जलद होते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहून केस गळणे, पांढरे होणे यासारख्या समस्या दूर होतात. हे योग प्रकारात देखील पाय वर आकाशाकडे तर  डोके आडवे जमिनीवर ठेवले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

अधोमुख स्वानासन:

News18

अधोमुख स्वानासन या आसनामुळे डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. अशा प्रकारे केस निरोगी आणि मजबूत होतात. या स्थितीत, तुमच्या तळहातावर आणि तळव्यावर शरीराचा संपूर्ण भार असतो, ज्यामध्ये तुमची कंबर ही वर उंच असते आणि डोके खाली असते. उत्तानासन :

News18

उत्तानासन म्हणजे पुढे वाकणे. या आसनात पाय सरळ ठेवून समोर नतमस्तक व्हायचे आहे. या योगाभ्यासामुळे डोक्यात रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. मेंदूतील रक्ताभिसरण चांगले झाल्यामुळे तणावही दूर होतो. पावसाळ्यात फंगल इंफेक्शनने त्रस्त आहात? मग या घरगुती उपायांनी मिळेल आराम उस्त्रासन :

News18

उस्त्रासन योगाभ्यासात माने आणि शरीराच्या वरच्या भागात रक्ताचा प्रभाव जलद होतो आणि डोक्यात रक्ताभिसरणही चांगले होते. त्यामुळे केसांना सहज फायदा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात