मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /स्वत:चेच केस ओढून खात होती चिमुरडी, डॉक्टरांनी पोटातून काढला तब्बल 100 ग्रॅम गोळा!

स्वत:चेच केस ओढून खात होती चिमुरडी, डॉक्टरांनी पोटातून काढला तब्बल 100 ग्रॅम गोळा!

Mumbai News : स्वतःचे ओढलेले केस खाण्याची सवय या मुलीच्या जीवावर बेतली असती पण वेळीच लक्षात आल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Mumbai News : स्वतःचे ओढलेले केस खाण्याची सवय या मुलीच्या जीवावर बेतली असती पण वेळीच लक्षात आल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Mumbai News : स्वतःचे ओढलेले केस खाण्याची सवय या मुलीच्या जीवावर बेतली असती पण वेळीच लक्षात आल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 30 मार्च : लहानपणी खेळताना कोणत्याही वस्तू वा तत्सम पदार्थ तोंडात घालण्याची सवय मुलांना असते. पण ही सवय मुलांच्या जीवावर बेतू शकते. याचाच प्रत्यय नुकताच मुंबईत आला आहे. स्वतःचे ओढलेले केस खाण्याची सवय या मुलीच्या जीवावर बेतली असती पण वेळीच लक्षात आल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्‍ये नुकतेच 10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून 100 ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढण्यात आला आहे.

    दादर येथील कियारा बन्सल (नाव बदलले आहे) हिला वयाच्या नवव्या वर्षी मासिक पाळी आली. म्हणून ती मासिक पाळीचे औषधे घेत होती. रुग्णाला खूप रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ पोटदुखी होत होती. पण त्याचा त्रास होत नव्हता. तिला उलट्या होणे, हालचाल करताना वेदना जाणवणे, वजन कमी होणे. यासारखी इतर कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. यामुळे मुलीचे कुटुंब घाबरले आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करुन विविध डॉक्टरांचा सल्ला घेतला.

    पोटात गाठ असल्‍याचे जाणवले

    वेदना मेसेंटरिक लिम्फॅडेनाइटिसशी संबंधित असल्‍याने ओटीपोटाच्या लिम्फ नोड्सला सूज आली असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्‍यानुसार तिला डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. ही स्थिती सामान्यतः तिच्या वयोगटातील रुग्णांमध्ये दिसून येते. ज्यामुळे ओटीपोटात वेदना होतात. वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णावर लक्षणात्मक उपचार केले जातात. परंतु, मुलीच्या पोटाला स्पर्श करताना गाठ असल्यासारखे जाणवल्‍याचे आईला सांगितले. तिची आई घाबरली आणि तिने तिला पुढील उपचारासाठी मुलीला बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये दाखल केले.

    केसांचा गोळा

    बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे बाल शल्यचिकित्सक डॉ. पराग करकेरा सांगतात की, क्लिनिकल तपासणीत आम्हाला पोटात गाठ असल्याचे जाणवली. ओटीपोटात दुखत असलेले रुग्ण नियमितपणे येतात परंतु तेथे गाठ जाणवत नाही. आम्ही एक सीटी स्कॅन केले ज्यामध्ये ट्रायकोबेझोअर दिसले जो पोटातील केसांचा गोळा होता आणि त्याचा काही भाग ड्युओडेनममध्ये (लहान आतड्याचा पहिला भाग) दिसून आला. केस विरघळण्यास सक्षम नसतात, म्हणून ते पचनसंस्थेत राहते आणि नंतर ते बॉलच्या आकारातील गोळा किंवा वस्तुमानात रूपांतरीत होऊन ते सतत वाढत जाते.

    गर्भवती डॉक्टरने चालवली रुग्णवाहिका, तरुणाचे प्राण वाचवणारी देवदूत!

    मुलांमध्ये हे क्वचितच दिसून येते. या रुग्णाला ट्रायकोटिलोमॅनिया (अशी स्थिती ज्यामध्ये स्वतःचेच केस काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते). तिला ट्रायकोपागियाचा त्रासही होता, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःचे केस खाते. तिच्या आई-वडिलांनाही तिचे केस खाण्याबाबत माहिती नव्हती. तपासणीनंतर, तिला गॅस्ट्रोटॉमी आणि केसांचा गोळा काढून टाकण्यासाठी लॅपरोटॉमीचा सल्ला देण्यात आला.

    100 ग्रॅम वजनाचा गोळा काढला

    डॉ करकेरा पुढे सांगतात की, गॅस्ट्रोटॉमी म्हणजे बेझोअर काढून टाकण्यासाठी पोटात एक छिद्र तयार करावे लागते. या प्रकरणात ट्रायकोबेझोअर हे गिळलेल्या केसांपासून बनलेले वस्तुमान होते. ही प्रक्रिया सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर 100 ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरच्या सातव्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास आतड्यांसंबंधी समस्या किंवा आतड्यांना छिद्र येणे म्हणजेच पोटाच्या भिंतीला छिद्र आणि लहान आतड्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

    First published:
    top videos

      Tags: Health, Lifestyle, Local18, Mumbai