मुंबई, 24 फेब्रुवारी : डायबेटीस अर्थात मधुमेह हा गंभीर स्वरूपाचा आणि गुंतागुंत निर्माण करणारा चिवट आजार आहे. डायबेटीसमध्ये ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं आवश्यक असतं. यासाठी रुग्णाला योग्य आहार, व्यायाम आणि औषधोपचारांकडे काटेकोर लक्ष द्यावं लागतं. डायबेटीसच्या रुग्णांनी गोड पदार्थ खाणं टाळावं असा सल्ला नेहमी दिला जातो; पण काही फळं आणि खजूर खाणं या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतं. डायबेटीसच्या रुग्णांनी खजूर अवश्य खावेत, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. अर्थात यामागे काही कारणं आहेत. ही कारणं कोणती ते जाणून घेऊ या. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती दिली आहे. खजूर खूप चविष्ट असतात. त्यामुळे कोणत्याही ऋतूत खजूर खायला अनेकांना आवडतात. परंतु, हिवाळ्यात खजूर प्राधान्याने खाल्ले जातात. खजूर उष्ण असल्याने उन्हाळ्यात खाणं टाळावं. खजुरात अनेक पोषक घटक असल्याने आरोग्य तज्ज्ञ नियमितपणे खजूर खाण्याचा सल्ला देतात. खजूर गोड असल्याने तो डायबेटीसच्या रुग्णांनी खावा की नाही असा संभ्रम कायम पाहायला मिळतो. प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं, की `खजुरात फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांनी खजूर अवश्य खावा.` ‘या’ पदार्थांमुळे येऊ शकते नैराश्य-चिंता, आनंदी राहण्यासाठी प्रमाणात खाणंच योग्य खजुरात फायबर्स व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, बी 6, के, कॉपर, मॅग्नेशियम, मँगनीज, नियासिन, आयर्न आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे खजूर आरोग्यासाठी उपयुक्त आहे. खजुरात मॅग्नेशियम असल्याने हाडं मजबूत होतात. खजूर खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी खजूर अवश्य खावा. खजुरामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. वजन कमी करण्यासाठीदेखील खजूर खाणं लाभदायक ठरतं. खजुरातल्या डाएटरी फायबर्समुळे रक्तात साखर शोषण्याची गती कमी होते. त्यामुळे शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. खजुरासोबत एक किंवा दोन अन्य ड्रायफ्रूट्स खाल्ली, तर बराच वेळ भूक लागत नाही आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे खजूर खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल एकदम वाढत नाही. डायबेटीसचे रुग्ण दिवसभरात दोन खजूर खाऊ शकतात; पण प्रकृती बरी नसेल तर खजूर खाण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ओट्स किंवा संत्र्यासह खजूर खाल्ला तर शरीराला फायबर्स मिळतात. त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खजूर खाण्यास काहीच हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.