बाजारातून फ्रेश कढीपत्ता आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून त्याची पाने वेगवेगळी करा. मग ही पण सुती सुक्या कपड्यात ठेऊन पंख्याखाली वाळवा.
कढीपत्ता अधिककाळ फ्रेश ठेवण्यासाठी त्याला एअर टाइट डब्यात खाली टिश्यू पेपर टाकून त्यावर कढीपत्ता ठेवा. नंतर हा डब्बा फ्रिजमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे एअर टाइट डबा नसेल तर झीप लॉक प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू शकता.
कढीपत्त्याच्या पावडरचे सेवन डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी देखील याचा फायदा होतो.