मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून खा, नक्की दिसेल परिणाम

Health tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून खा, नक्की दिसेल परिणाम

सतत गुळण्या केल्याने काय होतं हे माहिती व्हायला हवं.

सतत गुळण्या केल्याने काय होतं हे माहिती व्हायला हवं.

थायरॉइड आरोग्यावर अनेक घातक परिणाम करतात. त्याला रोखण्यासाठी या काही सोप्या टिप्स.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 7 मार्च : आजकाल थायरॉईडची समस्या अतिशय सामान्य झालेली आहे. हा आजार गळ्यात असलेल्या थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होतो. (health tips)

यात अचानक वजन वाढणं किंवा वजन कमी होणं, गळ्यात सूज येणं, केस गळणं, आवाज बदलणं अशा गोष्टी होतात. थायरॉईड दोन प्रकारचा असतो. हायपरथायरॉईड आणि हायपोथायरॉईड. यापासून वाचण्यासाठी डायटवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी तुमच्या रोजच्या आहारात घ्या. (how to deal with thyroid)

आयोडीनयुक्त गोष्टी

ज्या गोष्टीत आयोडीन जास्त आहे त्या आहारात घ्या कारण आयोडीन थायरॉईडच्या दुष्परिणामांना रोखत या आजारापासून वाचवतं. यासाठी मनुका, बटाटा, दूध, दही, ब्राऊन राईस आणि लसूण अशा गोष्टी खा. (ways to handle thyroid)

फळं आणि ज्यूस

डाळिंब, सफरचंद, केळी, द्राक्ष, टरबूज अशा गोष्टी नक्की खा. फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. फळं खाल्ल्यानं रोगप्रतिकारकक्षमता वाढते. फळं थायरॉईडच नाही तर इतर अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतात. (diet for thyroid problem)

डेअरी प्रॉडक्ट्स

डेअरी प्रॉडक्ट्स आहारात नक्की घ्या. यात खूप जास्त जीवनसत्व, मिनरल्स, कॅल्शिअम असतं. याशिवाय रोगप्रतिकार यंत्रणेला बळ मिळतं. विविध रोगांपासून बचाव होतो. दूध (फूल क्रीम, टोन्ड, स्किम्ड, लो-फॅट), दही, लोणी, चीज, पनीर, क्रीम आणि कस्टर्डसारख्या गोष्टी सतत खा. (what to eat in thyroid)

हेही वाचा धक्कादायक! अहमदनगरमध्ये व्यापाऱ्याचं अपहरण, गावकऱ्यांनी उचललं हे पाऊल

सी फूड

थायरॉईडपासून बचाव व्हावा यासाठी आहारात सी-फूड नक्की घ्या. शेलफिश, झिंगे आणि सागरी मासे नक्की खा. यात असलेलं ओमेगा - ३ फॅटी ऍसिड थायरॉईडपासून वाचण्यासाठी उपयोगी असू शकतं. (diet to have in thyroid)

हेही वाचा घोड्याला खांद्यावर घेतो, अंगावरून कार गेली तरी सहीसलामत,पाहा या ताकदवानाचे VIDEO

लोह आणि कॉपरयुक्त आहार

थायरॉईडपासून वाचण्यासाठी अशा गोष्टी खा ज्यात लोह आणि तांबं अर्थात कॉपर जास्त प्रमाणात असेल. यासाठी पालक, विविध शेंगा, ब्रोकोली, लाल मांस, भोपळ्याच्या बिया, बदाम, टोफू, काजू, सूर्यफुलाच्या बिया यांचा आहारात समावेश करा.

(Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Wellness