Home /News /lifestyle /

Health tips : मासिक पाळीचा त्रास असह्य होतोय? हे आहेत त्यापासून वाचण्याचे घरगुती उपाय

Health tips : मासिक पाळीचा त्रास असह्य होतोय? हे आहेत त्यापासून वाचण्याचे घरगुती उपाय

मासिक पाळीचा त्रास अनेकदा दैनंदिन जगणंच ठप्प करतो. हे आहेत तो थांबवण्याचे मार्ग

    मुंबई, 12 जून : मासिक पाळीत असह्य त्रास होण्याची समस्याच अनेक महिलांना सतावते. विशेषतः सुरवातीच्या दोन-तीन दिवसात जास्त त्रास होतो. पोटाच्या खालच्या भागात आणि कंबरेत खूप त्रास होतो. सोबतच चिडचिड आणि मूड स्विन्ग्जसुद्धा होतात. (health tips) या गोष्टींपासून दूर राहता यावं यासाठी बहुतेकदा स्त्रिया औषधं घेणं पसंत करतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असू शकतं. अशात हे घरगुती उपाय करून या समस्या कमी करता येतात. हे जास्त प्रभावी आणि हितकारक असतं. हे असे काही उपाय आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही मासिक पाळीच्या काळातील त्रास कमी करू शकाल किंवा अगदी थांबवूही शकाल. (how to prevent period pain) गरम पाणी प्या मासिक पाळीत पोटाच्या खालच्या भागातल्या आणि कंबरेतल्या दुखण्याला थांबवण्यासाठी गरम पाणी प्या. यातून दुखणं कमी होईल सोबतच उल्टी आणि हृदयात धडधडणं अशा समस्याही कमी होतील. (home remedies to stop period pain) गरम पाण्यानं शेका पिरियड्समधील त्रासापासून सुटकेसाठी गरम पाण्याच्या पिशवीनं पोटाच्या खालच्या भागासह कंबरेला शेकू शकता. यासाठी हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याच्या बाटलीचा आधार घ्या. असं केल्यानं वेदना थांबेल आणि अनियमित पाळीची समस्याही सुटेल. (ways to stop period pain) हेही वाचा तुमची फक्त ही एकच सवय आहे दीर्घायुष्य जगण्याचा मंत्र तीळ, नारळ किंवा ऑलिव्हच्या तेलानं मालिश तीळ, नारळ किंवा ऑलिव्हच्या तेलानं मालिश केल्यास पाळीच्या दरम्यान पोटाच्या खालच्या भागात आणि कंबरेच्या दुखण्यात दिलासा मिळतो. तिन्हीपैकी कुठलंही तेल थोडं कोमट करून पोट आणि कंबरेची मालिश करा. यातून वेदनाही कमी होईल आणि मांसपेशींचा ताणही कमी होईल. (how to get rid of period pain) गरम पाण्यानं अंघोळ करा पिरियडच्या दिवसात जेव्हा अंघोळ कराल तेव्हा गरम पाणीच वापरा. पोट आणि कंबरेच्या दुखण्यापासून आराम मिळेल. सोबतच अनियमित पाळीची समस्याही सुटेल. अंगदुखी कमी होईल. हेही वाचा कोरोनाची दुसरी लाट घातक नाही पण...; तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती आलं आणि काळी मिरीचा चहा पिरियड्सच्या पाच दिवसात हृदयात धडाधड वाढणं, मांसपेशी ताणलं जाणं या समस्या जाणवतात. यापासून आराम मिळवण्यास आलं आणि काळी मिरीचा चहा घ्या. जिरे हळद आणि मधाचा काढा जिरे हळद आणि मधाचा काढा पिल्याने पोटाच्या खालच्या भागात आणि कंबरेच्या दुखण्यात दिलासा मिळतो. यासाठी एक ग्लास पाणी घेत त्यात एक चमचा हळद आणि दोन चमचे जिरे टाका. याला अर्धं राहीपर्यंत उकळा. यात एक चमचा मध मिसळून प्या. हळदीचं दूध प्या पाळीच्या काळात कंबर, पोट आणि अंग दुखत असेल तर एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद पावडर टाका आणि मिसळून प्या. सोप आणि मध एक चमचा सोपं एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. हे पाणी कोमट झाल्यावर यात एक चमचा मध टाकत प्या. यातून त्रासापासून सुटका होईल. (Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Pain, Periods

    पुढील बातम्या