जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दुधीची भाजी केल्यावर साल फेकू नका; चेहऱ्यावर लावल्याने त्वचा होईल सुंदर

दुधीची भाजी केल्यावर साल फेकू नका; चेहऱ्यावर लावल्याने त्वचा होईल सुंदर

दुधीमध्ये भरपूर व्हिटॅमीन,झिंक आणि फायबर असतं. त्यामुळे वेगाने वजन कमी होतं. दुधी पचायला हलका असतो. त्यामुळे पचन सुधारतं.

दुधीमध्ये भरपूर व्हिटॅमीन,झिंक आणि फायबर असतं. त्यामुळे वेगाने वजन कमी होतं. दुधी पचायला हलका असतो. त्यामुळे पचन सुधारतं.

दुधी शरीराबरोबर स्किन प्रॉब्लेममध्येही (Skin Problem) उपयोगी पडतं. दुधीची साल चेहऱ्यावर लावण्याची खास पद्धत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जून : आपण भाज्या,फळ यांचा वापर आपल्या आरोग्यासाठी (Health) करतो. मात्र त्याची साल (Peels) फेकून देतो. मात्र साली मध्येच अनेक पोषक घटक **(Health Benefits)**असतात.  दुधी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दुधीची भाजी आपण आवडीने खातो. दुधी थंड असते. त्यामुळे पोटाचे विकार (Stomach Infection) होत नाहीत. दुधी शरीराबरोबर स्किन प्रॉब्लेममध्येही (Skin Problem) उपयोगी पडते. दुधीच्या सालीचा उपयोग त्वचेवर कसा करता येते हे जाणून घेऊयात. सनबर्न आणि टॅनिंग कमी करतं उन्हात फिरल्यामुळे त्वचेवर सनबर्न किंवा टॅनिंग झालं असेल आणि त्यामुळे त्वचा काळी पडली असेल तर, त्याकरता दुधीची साल वापरता येऊ शकते. दुधीची साल वाटून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर किंवा काळं पडलेल्या भागावर लावून 20 मिनिटांनी धुवून टाका. ( जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती? ) स्किन ग्लो चेहऱ्याची त्वचा निस्तेज झाली असेल तर, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी दुधीच्या सालीचा वापर करू शकता. दुधीच्या सालीची पेस्ट बनवा. 2 चमचे पेस्ट एका भांड्यात घ्या. त्यामध्ये 1 चमचा चंदन पावडर टाका आणि चेहऱ्यावर लावा 20 मिनिटांनी धुवून टाका. आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करा. ( काय सांगता! फक्त झोपूनही घटू शकतं वजन; पूर्ण होईल स्लीम ट्रिम होण्याचं स्वप्न ) चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी बर्‍याचदा चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळे डाग पडतात. डाग पडलेल्या चेहर्‍यासाठीही दुधीची साल वापरता येऊ शकते. दुधीची साल उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर बनवा. 2 चमचे दुधीच्या चालीची पावडर आणि 2 चमचे गुलाब पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा. चेहरा आणि मानेवर लावा 20 मिनिटांनी धुवून टाका. ( कफ आणि वात दोघांनाही ठेवेल दूर; पावसाळ्यात घ्या असा उत्तम आहार ) त्वचेची जळजळ बऱ्याच वेळा त्वचेची जळजळ होत असते. त्वचेला थंडावा देण्यासाठी दुधीची साल वापरू शकता. ज्या भागाची जळजळ होत असेल त्या भागावर दुधीच्या सालीची पेस्ट बनवून लावा. त्वचेला थंडावा मिळेल. तळव्यांची आग उन्हाळ्यामध्ये तळव्यांची आग होण्याचा त्रास अनेकजणांना होतो. यासाठी देखील दुधीची साल वापरता येऊ शकते. याकरता दुधीची साल किंवा दुधीचा तुकडा घेऊन पायाच्या तळव्यांवर 10 मिनिटे मसाज करा. यामुळे तळव्यांची जळजळ थांबून आराम मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात