मुंबई, 14 मार्च : सामान्यतः कोरफडीचा गर वापरला जातो तो सनबर्न आणि स्किन रॅशेज यांना बरं करण्यासाठी. मात्र, याचे इतर फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल. कित्येकांच्या बागेत आढळणारी कोरफड अनेक औषधी गुणांनी भरलेली आहे. इतिहास पाहिला तर नॉर्थ आफ्रिका, साऊथ युरोप आणि इजिप्तशी कोरफडीचं नातं दिसतं. या भागांमध्ये कोरफडीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. Healthline च्या वृत्तानुसार, कोरफडीचे उपयोग पाहिले तर वैद्यकीय क्षेत्रात हार्ट बर्नपासून ब्रेस्ट कँसरवर उपचार करण्यासाठी कोरफड वापरली जाते. आजही कोरफडीवर जगभरात संशोधन सुरू आहे. जाणून घ्या कोरफडीचे काही उपयोग.
हृदयाच्या जळजळीवर उपयोगी
गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज ही एक पचन तंत्राशी संबंधित समस्या आहे. या समस्येमुळे हार्ट बर्न होतं. 2010 च्या एका संशोधनात असं आढळलं, की जेवताना 1 ते 3 ग्रॅम कोरफडीचा गर खाल्ल्यास हार्ट बर्न होत नाही. कोरफड खाल्ल्यानं पचनाशी संबंधित समस्याही होत नाहीत. (aloevera benefits for human body)
फळं आणि भाज्या राहतात ताज्या
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात असं आढळलं, की टोमॅटोच्या रोपावर कोरफडीच्या जेलची कोटिंग केली गेली तेव्हा या रोपावर अनेक बॅक्टरीया अटॅक करू शकले नाही. सफरचंदाच्या झाडाबाबतही असंच झालं. यावरून म्हटलं जाऊ शकतं, की फळं आणि भाज्या दीर्घकाळ ताज्या ठेवण्यास कोरफडीचं जेल उपयोगी आहे. (aloevera for good digestion)
माऊथवॉश सारखा करा उपयोग
2014 मध्ये इथिओपियन जर्नलमध्ये आलेल्या संशोधनानुसार, केमिकलयुक्त माऊथवॉशच्या तुलनेत एलोवेरा जेल जास्त प्रभावी आणि सुरक्षित आहे. एलोविरामध्ये नैसर्गिक क जीवनसत्व असतं. हे अनेक किटाणूंना दूर ठेवतं. सोबतच हिरड्यांचं दुखणं, सूज यांनाही रोखू शकतं.
रक्तातली साखर होते कमी
एका संशोधनानुसार, तुम्ही टाईप टू मधुमेहाचे पेशंट असाल तर रोज दोन चमचे एलोवेरा जेल खा. यातून साखर संतुलित होईल. मात्र आधीपासून औषधं घेत असाल तर हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (aloevera for health)
त्वचा राहते तेजस्वी
एलोवेरा जेल त्वचेला लावणं अतिशय मोलाचं आहे. यातून त्वचेवरचे डाग जातात सोबतच त्वचा दुरुस्त होते. त्वचेवरचे रॅशेस जातात. सनबर्नचा प्रभावही कमी होतो.
हे वाचा - वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर
कोंडा कमी होतो
एलोवेरामध्ये अँटी फंगल आणि मॉश्चरायझिंग गुण असतात. केसांच्या मुळाशी हे जेल लावल्यास कोंडा दूर होतो. केसांचं पोषणही होतं.
हे वाचा - Ready To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा
यकृताच्या समस्या आणि बद्धकोष्ठ दूर होतो
कोरफडीचा ज्यूस पिल्यानं शरीर डिटॉक्स होतं. यातून यकृताचं कार्य नीट चालतं. रोज कोरफडीचा रस पिल्यास बद्धकोष्ठताही नीट होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Skin care