मुंबई : आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यकृत आहे. हे निरोगी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे.यकृत शरीरात 500 पेक्षा जास्त प्रकारची कामे करते. यकृत पित्त तयार करते. हे पोटातील पचन दरम्यान तयार होणारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
यकृत शरीरासाठी आवश्यक असलेल्या काही प्रथिने, कोलेस्टेरॉल, हार्मोन्ससह अनेक महत्त्वाच्या गोष्टी बनवते. आजकाल, लिव्हर डिटॉक्सच्या नावाने अनेक गोष्टी बाजारात आल्या आहेत, ज्या यकृत शुद्ध करतात असा दावा केला जातो. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अनेक अभ्यासात यकृत डिटॉक्सचा विशेष फायदा नाही. लिव्हर डिटॉक्सपेक्षा यकृत मजबूत करणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सकस आहार घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
हा सकस आहार घेण्यासाठी कोणत्या गोष्टी आहारात असायला हव्यात याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. जर या वस्तू आहारात असतील तर आपल्याला त्याला फायदा होईल आणि यकृतही निरोगी राहील.
World TB Day : कोरोना काळातील एक चूक आणि टीबीचा उद्रेक; मुंबईची आकडेवारी हादरवणारी
कोणत्या गोष्टी आहेत?
1. फळ - रोज फळं खायला हवीत. प्रत्येक हंगामात येणारी भरपूर फळं खा. फळ खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे यकृत देखील तंदुरुस्त राहातं. ब्लू बेरी, स्ट्रॉबेरी, क्रेनबेरी, ग्रेपफ्रूट यांचं सेवन जास्त करावं. त्याचे फायदे शरीरासाठी जास्त आहेत.
2. कडधान्य- यामध्ये कॅन्सरला रोखण्याची क्षमता असते. एक कप कडधान्य रोज खायला हवीत. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहातं असं अभ्यासातून समोर आलं आहे.
3. हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्या यकृत निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे यकृत मजबूत करतात. एकूणच आरोग्यासाठी या भाज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्सची कमतरता असते, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यामुळे यकृतावर कमी दाब पडतो आणि यकृत मजबूत होते.
शरीराला कोणत्या व्हिटॅमिनची किती गरज? जास्त सेवन आरोग्याला घातक
4. बदाम - बदाम फक्त मेंदूसाठीच फायदेशीर नसून ते यकृतासाठीही खूप उपयुक्त आहे. बदामामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात जे यकृताला निरोगी बनवतात.
5. एरोबिक एक्सरसाइज -हार्वर्ड हेल्थच्या मते, यकृत मजबूत करण्यासाठी व्यायाम देखील आवश्यक आहे. एरोबिक व्यायाम यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. एरोबिक व्यायामामध्ये वेगाने चालणे, सायकल चालवणे आणि अधिक शारीरिक हालचालींचा समावेश होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips