Home /News /lifestyle /

#Overthinking: तुम्हीही अतीविचार करता का? हे आहेत त्यावर मात करण्याचे प्रभावी उपाय

#Overthinking: तुम्हीही अतीविचार करता का? हे आहेत त्यावर मात करण्याचे प्रभावी उपाय

विचार करणं वाईट नाही पण त्याचा अतिरेक नक्कीच घातक आहे.

    मुंबई,  15 जानेवारी :   जीवनात चढउतार तर येताच असतात. मात्र काही लोकांना आपल्या आयुष्याबाबत सतत तक्रारीच करत असतात. त्यांना आपल्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाटतं. अनेकदा अशा लोकांना आपल्यातली उमेद, उत्साह कमी होताना दिसतो. ते सतत विचारात बुडालेले दिसतात. या सतत विचार करत राहण्यानं ते ओव्हरथिंकिंगनं ग्रस्त होतात. सतत या अवस्थेत राहण्यानं तुम्ही आजारीही पडू शकता. ओव्हरथिंकिंग हे गंभीर भावनिक संकट बनू शकतं. (how to stop overthinking) जास्त विचार करण्यानं तुमची झोप आणि जेवणा-खाण्यात जगण्यात अडथळे येऊ शकतात. तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये अडकू शकता. पिंकव्हिलाच्या एका वृत्तानुसार, ओव्हरथिंकींगमध्ये तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत राहतात. यातून तुम्ही आनंदी आणि सकारात्मक राहण्यापासून परावृत्त होता. अशावेळी काही उपायांचा अवलंब करून तुम्ही ओव्हरथिंकिंग थांबवू शकता. (bad effects of overthinking) अर्धवट कामं पूर्ण करा अनेक लोक ओव्हरथिंकिंगच्या चक्रापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तात्पुरतं उत्तर शोधतात. यामुळं तात्पुरता दिलासा मिळतो मात्र पुन्हा समस्या तशीच राहते. ओव्हरथिंकिंगपासून सुटका मिळवण्यास हे गरजेचं आहे, की समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यर्थ गोष्टींचा विचार करण्यात वेळ घालवू नका. अपुरी कामं पूर्ण करा. यातून पुढची कामं करण्याची प्रेरणा मिळेल. (how to deal with overthinking) हेही वाचा मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या अनेक समस्येवर उपाय अस्वस्थतेला समजून घ्या ओव्हरथिंकिंगच्या गर्तेत तुम्ही बुडत आहात हे जाणवल्यावर आपलं लक्ष विविध छंदांवर केंद्रित करा. संगीत एका, गाणं शिका. अगदी जेवण बनवणं, डान्स करणं, टीव्ही शो पाहणं हेसुद्धा उपयोगी ठरेल. चित्रं काढणं, योगाचा क्लास करणं यातूनही तुम्ही मनःस्थिती चांगली ठेऊ शकता. यातून मेंदूही सक्रिय राहील. (effects of overthinking) आपल्या ध्येयाबाबत विचार करा दिवसभर आपल्या विचारात बुडालेलं न राहता एक वेळ निश्चित करा जेव्हा तुमचं ध्येय किंवा पुढची योजना याबाबत तुम्ही विचार करू शकाल. सोबतच आत्मपरीक्षण आणि चिकित्साही करू शकता. निसर्गाशी जोडलेलं रहा ओव्हरथिंकिंग एकटं असताना जास्त सतावते. अशावेळी अशा गोष्टींपासून दूर रहा ज्या ताण देतात किंवा घाबरवतात. दिवसाचा काही वेळ मेडिटेशन करा. संध्याकाळी वॉक घ्या. निसर्गातली शांतता तुम्हाला समाधान देईल. हेही वाचा 30 मिनिटं 'मॉर्निंग वॉक' करुन अनेक आजारांना ठेवा दूर, जाणून घ्या जबरदस्त फायदे वर्तमानावर लक्ष केंद्रित करा तुम्ही नकारात्मक विचार करता तेव्हा या नकारात्मकतेच्या कारणाला ओळखण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना स्वतःवर नियंत्रण मिळवू देऊ नका. त्यांना याबाहेर फेका. यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवा. भविष्यात काय होईल याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. भविष्याबाबत चांगला विचार करा. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Positive thinking

    पुढील बातम्या