• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Vastu Tips : सूर्यास्तानंतर ही 9 कामं करणं अशुभ मानलं जातं; घरावर येऊ शकतं संकट, वाईट बातमी

Vastu Tips : सूर्यास्तानंतर ही 9 कामं करणं अशुभ मानलं जातं; घरावर येऊ शकतं संकट, वाईट बातमी

Vastu Tips : सूर्यास्तानंतर काही गोष्टी केल्यामुळं घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा कोपते, असे मानले जाते, चला तर मग जाणून घेऊया सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामं आहेत जी ठराविक वेळी करावीत असं मानलं जातं. काही कामं संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर (sunset) न करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यास्तानंतर कोणती कामं करू नयेत याविषयी (Vastu Tips) जाणून घेऊया. सूर्यास्तानंतर (sunset) काही गोष्टी केल्यामुळं घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा कोपते, असे मानले जाते, चला तर मग जाणून घेऊया सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत. 1. नखे आणि केस कापणे सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नयेत. एवढेच नाही तर दाढी करणे देखील टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. असे केल्याने घरावरील कर्ज वाढते असे मानले जाते. 2. झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे असे मानले जाते की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर झाडे आणि वृक्षदेखील झोपतात. 3. कपडे धुणे आणि वाळवणे सूर्यास्तानंतर कपडे धुण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो. 4. अन्न उघडे ठेवणे सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे, जर ते सोडले तर नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकते. 5. अंत्यसंस्कार सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करू नयेत, असे पुराणात सांगितले आहे. असे केल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते आणि पुढील जन्मात तो अपंग जन्माला येऊ शकतो. हे वाचा - एखाद्याच्या मृत्यूनंतर Aadhaar आणि PAN कार्डचं काय करायचं? वाचा काय आहे नियम 6. दही किंवा भात खाणे पुराणात सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन निषिद्ध मानले गेले आहे. तसेच सूर्यास्तानंतर भात खात नाहीत. 7. दही दान करणे दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो. अशा वेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी दूर होते. हे वाचा - T20 World Cup : मोहम्मद शहजाद हे काय केलंस? अफगाणिस्तानची घोडचूक टीम इंडियाला पडली भारी 8. झाडू मारणे असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घर झाडू नये किंवा साफसफाई करू नये. असे केल्याने धनहानी होऊ शकते. 9. संध्याकाळच्या वेळी झोपणे सूर्यास्तानंतर लगेच झोपू नये, म्हणजे सूर्यास्तानंतरच्या संधी प्रकाशामध्ये. यावेळी लैंगिक संबंध देखील निषिद्ध मानले जातात. असे केल्याने पती-पत्नीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यावेळी पूजेचे पठण केल्याचा फायदा आहे, असे मानले जाते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: