मुंबई, 21 डिसेंबर: थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. काय आहेत गाजराचे फायदे? जाणून घ्या 1. गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं. 2. गाजर कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता. 3. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो. 4. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते. वाचा- हाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळाच 5. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 6. गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात. 7. पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते. 8. गाजरात अ जीवनसत्व असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 9. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते. 10. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता. मात्र रोज एक कच्च गाजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्त फायदा होतो. वाचा- सांभाळा लहान मुलांचं आरोग्य, असं करा त्यांच्या आहाराचं नियोजन टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







