

हिरव्या भाज्या आणि मोड आलेलं धान्य मुलांना अजिबात आवडत नाही. पण मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी हेल्थी फुड फार गरजेचं आहे. त्यामुळे मुलांच्या आहारात कोणते पदार्थ असले पाहिजेत याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं.


गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती तसंच भरडलेलं धान्य किंवा ब्राउन ब्रेडचा समावेश लहान मुलांच्या रोजच्या आहारात करावा. त्यामुळे मुलांना पुरेसं व्हिटॅमिन बी आणि फायबर मिळण्यास मदत होते.


त्याचबरोबर मुलांचं आरोग्य तंदुरुस्त होते आणि अन्नपचन होण्यास मदतसुद्धा होते. मोड आलेलं धान्य, सोयाबीन, चणे रोजच्या रोज मुलांना खायला द्या.


मासे, अंड, मटार, दूध, फळ, मटण, सोया इत्यादी पदार्थांमध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मुलांनाही असे निरनिराळे पदार्थ खायला आवडतात. अशा प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.


मुलांच्या आहारात जर फळं आणि पालेभाजा महत्त्वाच्या असतात. फळांचा ज्युस सुद्धा मुलांना द्या. पण बाजारातील डबाबंद फळांचा ज्युस मुलांना देऊ नका. कारण त्यात साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. फळांचे ज्युस घरी बनवून त्यात साखर न टाकताच मुलांना द्या.