कोरियन महिलांचा (Korean Women) सुंदर चेहरा पाहून त्यांच्या वयाचा अंदाजच लावता येत नाही. त्यांच्याकडे पाहून पन्नाशीची महिलादेखील तिशीची असल्याचा भास होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरियन महिला 10 स्टेप्स फॉलो करतात. ही प्रोसेस थोडी लांब असते. पण अशाप्रकारे काळजी घेतली तर आपला चेहरा देखील कोरियन महिलांप्रमाणेच सुंदर दिसायला लागेल.
चेहऱ्यावर जमलेली घाण साफ न करताच झोपल्यास रात्रीत आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. चेहरा साफ करण्यसाठी कोरियन महिला क्लीजिंग ऑईलचा वापरतात. क्लीजिंग ऑईलने संपूर्ण चेहरा आणि मानेवर मॉलिश करा. त्यानंतर वेट कॉटन किंवा कापसाच्या बोळ्याने आपल्या चेहरा साफ करा.
क्लींजिंग ऑईलने चेहरा साफ केल्यानंतर चेहरा फोमिंग क्लिंजरने धुवा. फोमिंग क्लिंजरचे काही थेंब हातावर घ्या. त्यामध्ये थोडं पाणी घालून हातावर चोळा. थोडा फेस झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने धुऊन टाका.
क्लींजिंग ऑईलने चेहरा साफ केल्यानंतर चेहरा फोमिंग क्लिंजरने धुवा. फोमिंग क्लिंजरचे काही थेंब हातावर घ्या. त्यामध्ये थोडं पाणी घालून हातावर चोळा. थोडा फेस झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने धुऊन टाका.
चेहरा धुतल्यानंतर त्यावर टोनर लावणं अत्यंत आवश्यक आहे. रात्रीसुद्धा चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्यावर टोनर लावावं. यामुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचा पीएच बॅलन्स राहतो आणि चेहऱ्याची त्वचा हायड्रेट राहते.
स्किन केअर रूटीन मधला इसेन्स हा महत्त्वाचा भाग आहे. इसेन्स टोनरने आपली त्वता रात्रभर हायड्रेट राहते. सिरम पेक्षा इसेन्स टोनर हलकं असतं आणि कॉन्सन्ट्रेट असतं. ज्यामुळे चेहरा हायड्रेट राहतो.
एंपूल हे सुपर चार्ज सिरम आहे. प्रत्येक कोरियन महिलाच्या स्किन केअर रुटीने मधलं हे सीक्रेट आहे. हे आपल्या त्वचेला बुस्ट करतं. याशिवाय हे सिरम त्वचा रिपेअर करत.
आपल्या त्वचेला सूट होईल असं सिरम आपला चेहरा आणि मानेवर लावावं. स्किन प्रॉब्लेमसाठी सिरम वापरत असाल तर, ज्याभागावर प्रॉब्लेम आहे. त्या ठिकाणीच लावावं किंवा पिंपल्स येत असलेल्या ठिकाणीच वापरावं.
स्किन केअर रुटीने मधली महिलांची आवडती स्टेप शीट मास्क आहे. यामध्ये ऍन्सशील ऍक्टिव्ह एजंट असतात. शीट मास्कमुळे त्वचा डीप हायड्रेट होते. यामध्ये ऍन्टी एजिंग, कॉलेजन बूस्टर असे घटक असतात. आठवड्यातून एकदा वापरावं.
चेहऱ्याबरोबर डोळ्यांची काळजी घ्यायला हवी. त्याकरता आयक्रिम लावून हलक्या हाताने डोळ्याच्या भोवती मसाज करावा. यामुळे डोळ्याखाली सुरकुत्या येणं, डार्क सर्कल होणं असे त्रास होत नाहीत. डोळ्यांचा थकवा देखील कमी होतो
सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे मॉश्चरायझर लावा. त्यामुळे त्वचेला भरपूर पोषण मिळतं. यामुळे स्किन हेल्दी, हायड्रेटींग आणि रेडियंट बनते. तेलकट त्वचेसाठी वॉटर बेस्ड मॉश्चरायझर वापरावं.