जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : रोज 11 मिनिटे करा हे काम, हृदय कायम राहील निरोगी आणि कमी होईल कॅन्सरचा धोका!

Health Tips : रोज 11 मिनिटे करा हे काम, हृदय कायम राहील निरोगी आणि कमी होईल कॅन्सरचा धोका!

तुम्ही जास्त मेहनत घेऊ इच्छित नसाल तर आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट सांगत आहोत.

तुम्ही जास्त मेहनत घेऊ इच्छित नसाल तर आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट सांगत आहोत.

निरोगी राहण्यासाठी काही लोक खूप प्रयत्न करतात. तर काही लोकांना वेळ मिळत नाही किंवा ते प्रयत्नच करत नाही. पण जास्त मेहनत घेऊ इच्छित नसाल तर आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट सांगत आहोत. रोज 11 मिनिटे हे काम करा आणि कायम निरोगी राहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : एक म्हण आहे की, “धावणारा घोडा आणि चालणारा माणूस कधीही म्हातारा होत नाही.” आता एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज चालतात, त्यांच्या अकाली मृत्यू आणि अनेक आजारांचा धोका खूप कमी होतो. दररोज 10,000 पावले चालण्याचे आव्हान आजकाल बरेच लोक घेत आहेत. खरे तर रोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. ही गोष्ट विज्ञानाने सिद्ध केली आहे. आता एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, नियमित चालल्याने अनेक जुनाट आजारांपासून संरक्षण होते. मधुमेहामुळे अकाली मृत्यू, हृदयविकाराचा झटका आणि अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, दररोज 11 मिनिटे चालणे 10 पैकी एक अकाली मृत्यू टाळू शकते.

Morning Routine : सकाळी बदाम दुधासोबत खा या छोट्या बिया, पोटाची प्रत्येक समस्येवर ठरेल रामबाण

जेव्हा हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार होतात, तेव्हा अकाली मृत्यूचा धोका वाढतो. द गार्डियनच्या एका अहवालात अभ्यासाचा हवाला देत असे सांगण्यात आले आहे की, आठवड्यातून केवळ 75 मिनिटे चालण्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटींनी कमी होतो. अनेक देशांच्या आरोग्य सेवा आठवड्यातून 150 मिनिटे चालण्याची शिफारस करतात. एवढ्या व्यायामाने 10 पैकी 1 मृत्यू वाचू शकतो अभ्यासानुसार, दररोज फक्त 11 मिनिटे ब्रिस्क वॉक नियमितपणे केले तरी अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. वेगवान चालण्यात अनेक गोष्टी येतात. तुम्ही चालत असाल तर त्याचा वेग 5 ते 6 किमी असावा. यासोबतच नृत्य, सायकल चालवणे, बाईक, टेनिस खेळ, बॅडमिंटन खेळणेही वेगवान चालण्यासारखे आहे. केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, या सर्व क्रियाकलापांमुळे अकाली मृत्यू, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, काही कर्करोग इत्यादींचा धोका अनेक पटींनी कमी होतो. अभ्यासात असे म्हटले आहे की, आठवड्यातून 75 मिनिटांचा वेगवान व्यायाम केला तर जगातील 10 पैकी 1 मृत्यू टाळता येऊ शकतो. हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. 30 दशलक्ष लोकांचा डेटा केंब्रिज मेडिकल रिसर्च कौन्सिलचे डॉ. सोरेन ब्रज यांनी सांगितले की, जर तुम्ही एका आठवड्यात 150 मिनिटांची मध्यम तीव्रतेची शारीरिक हालचाल खूप कठीण मानली तर माझा हा अभ्यास खूप उपयुक्त आहे. यामध्ये केवळ 75 मिनिटांच्या वेगवान व्यायामाने तुम्ही या धोक्यांपासून मुक्त होऊ शकता. या अभ्यासात सुमारे 30 दशलक्ष लोकांमध्ये आरोग्य आणि व्यायाम यांच्यातील संबंध तपासणाऱ्या 94 मागील अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक आठवड्यातून 75 मिनिटे चालले, त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका 23 टक्क्यांनी कमी झाला. याशिवाय हृदयविकाराचा धोका 17 टक्क्यांनी आणि कर्करोगाचा धोका 7 टक्क्यांनी कमी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात