मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /औषधांशिवायही कंट्रोल करू शकता High Blood pressure; कसं ते पाहा

औषधांशिवायही कंट्रोल करू शकता High Blood pressure; कसं ते पाहा

रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.

हाय ब्लड प्रेशरवर (High blood pressure) हा उपाय केला तर औषधांची गरज पडत नाही किंवा औषधं घ्यावी लागली, तरी ती कमी प्रमाणात लागतात.

  मुंबई, 06 ऑगस्ट : धकाधकीचं जीवन, ताणतणाव, चुकीची आहारविहार पद्धती यामुळे अगदी तरुण वयातच अनेकांना हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure) म्हणजेच उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतो. हाय ब्लड प्रेशर हा एक गंभीर विकार असून यामुळे हार्ट अॅटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढतो. या आजाराला सायलेंट किलर (Silent Killer) असंही म्हटलं जातं. आता ब्लड प्रेशरची समस्या म्हटली की औषधं आलीच. औषधांनी तो कंट्रोल केला जातो. पण औषधांशिवायही ब्लड प्रेश कंट्रोल करता येऊ शकतं (Control blood pressure without medicine).

  तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत (Life Style) काही बदल केल्यास औषधांशिवाय हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतं. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन एका मर्यादेपर्यंत औषधांची (Medicine) गरज पडत नाही किंवा औषधं घ्यावी लागली, तरी ती कमी प्रमाणात लागतात.

  धूम्रपान, मद्यपान टाळा

  खरं तर तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या व्यसनांमुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या सुरू होते. त्यामुळे अशा व्यसनांपासून दूर राहणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची व्यसनं टाळल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

  भरपूर पाणी प्या

  डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट आणि चिकट होतं. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, तसंच अन्य काही समस्याही निर्माण होऊ शकतात.

  हे वाचा - त्वचा विकारांवर रामबाण औषध आहे ‘हे’ तेल; लगेच करा वापरायला सुरुवात

  ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी रोज 6 ते 8 ग्लास पाणी (Water) पिणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातली पाण्याची पातळी राखली जाते. तुम्ही उष्णता अधिक असलेल्या ठिकाणी काम करत असाल तर यापेक्षा अधिक पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.

  पुरेशी झोप घ्या

  उशिरापर्यंत जागून मोबाइल पाहणं, टीव्ही पाहणं आदींमुळे झोपेचं चक्र बिघडतं. सकाळी कामाला लवकर जायचं असल्यामुळे लवकर उठावं लागतं. या सगळ्यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे संप्रेरकांमध्येही बदल घडून येतात आणि हृदयविकाराचा धोकाही असतो. झोप कमी झाली, की ब्लड प्रेशर वाढतं. हे लक्षात घेता झोपेचं चक्र बिघडू न देण्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

  आहारात बदल करा

  ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी दैनंदिन आहारात बदलही महत्त्वाचा आहे. जंक फूड, फास्ट फूडमुळे वजन वाढून ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या भाज्या किंवा फळांमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं, त्यांच्या सेवनावर भर द्यावा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  हे वाचा - वेळीच द्या ‘या’ लक्षणांकडे लक्ष नाहीतर, येईल हार्ट अटॅक

  ज्यूस पिण्याऐवजी संपूर्ण फळं खाण्यावर भर द्यावा. मॅग्नेशियमसाठी कडधान्यं, डाळी, लीन मीट्स (Lean Meats) आदींचा आहारात समावेश ठेवावा. प्रक्रियायुक्त किंवा पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचं (Sodium) प्रमाण अधिक असतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे आहारात सोडियमचा वापर कमी असावा.

  व्यायाम करा

  ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांसाठी व्यायाम (Exercise) अत्यंत महत्वाचा असतो. व्यायामात कार्डिओ आणि एरोबिक्सचा समावेश असावा. ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी हे व्यायामप्रकार महत्त्वाचे असतात. व्यायाम करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर शारीरिक हालचाली भरपूर होण्यासाठी प्रयत्न करावा आणि वजन नियंत्रणात ठेवावं. या व्यतिरिक्त योगा, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज आणि ध्यानधारणेमुळे (Meditation) तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव (Stress) ब्लड प्रेशर वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. यामुळे हार्ट रेटही वाढतो. त्यामुळे तणावाचं व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Lifestyle