
आजकाल बाजारामध्ये ऑलिव्ह ऑईल,आव्होकाडो ऑईल आणि जोजोबा ऑईल यासारखे अनेक तेल मिळतात. या तेलांप्रमाणे अर्गन ऑईल सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे.

हे ऑईल अतिशय हलकं असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन ई आणि फॅटी ऍसिड असतं. यामुळे त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात.

अर्गन ऑईल ऍन्टी एजिंगप्रमाणे काम करतं. यामुळे त्वचेमध्ये इलास्टिसिटी वाढते आणि त्यामुळे त्वचा मुलायम बनते.

त्याच्या नियमित वापरामुळे एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा निघून जाते. अर्गन ऑईल त्वचेसाठी बेस्ट मॉश्चरायझरचं काम करते. यामुळे स्किन हायड्रेट राहते.त्याच्या नियमित वापरामुळे एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा निघून जाते. अर्गन ऑईल त्वचेसाठी बेस्ट मॉश्चरायझरचं काम करते. यामुळे स्किन हायड्रेट राहते.

यातील विटामिन ई आणि फॅटी ऍसिड त्वचेला नैसर्गिकरित्या तजेलदार बनवतात. यामुळे ड्राय स्किनचा त्रास कमी होतो.

स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी देखील अर्गन ऑईल वापरता येऊ शकतं.स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी देखील अर्गन ऑईल वापरता येऊ शकतं.

अर्गन ऑईलमध्ये ऍन्टीबॅक्टरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ, खाज, रॅशसे असे त्रास कमी होतात.




