दिल्ली,06 जुलै : समजा आपल्या डोळेच नाहीत किंवा आपल्याला काही दिवस डोळे बंद करून रहायचं आहे. कशी अवस्था होईल? विचारही करवत नाही ना. खरंतर डोळे शरीराच्या सर्व अवयवांमधील अतिशय महत्वाचा (Eyes are Important Organs of Body)आणि नाजूक भाग आहे. कारण डोळ्यांमुळेच आपण आपल्या सभोवतालचं जग पाहू शकतो. डोळे जितके महत्वाचे आहे डोळ्यांची योग्य काळजी घेणे (Eye Care) देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रदूषित वातावरणामुळे (Polluted Environment) आपल्या डोळ्यांना बरंच नुकसान (Harm) होतं.
त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी रोजच्या रोजच्या सवयींमध्ये काही गोष्टी करणं काळाची गरज आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी आपल्याला कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
तासंतास मोबाईल, कंम्प्युटरचा वापर
सतत कंम्प्युटरवर किंवा मोबाईलवर डोळे लावून काम करावं लागत असेल तर, डोळ्यांना खूप त्रास होऊ शकतो. त्यातून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. पण, नाईलाजाने काम करावच लागत असेल तर, काम करताना थोड्याथोड्या वेळाने ब्रेक घ्या आणि आपली नजर फिरवा.
(आवडत नसला तरी ‘हा’ कडू रस रोज प्या, फटाफट होईल वजन कमी)
मेकअप न काढता झोपणं
महिला बर्याच वेळा थकल्यामुळे डोळ्यांवरचा मेकअप काढण्याचा कंटाळा करतात. काही महिला डोळ्यांवरील मेकअप न काढता झोपी जातात. त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या खराब करू शकतात. बर्याच प्रकारचे इन्फेक्शन देखील होऊ शकतात.
कडक उन्हाचा त्रास
उन्हात फिरताना डोळ्यांवर सनग्लासेस न लावण्याने सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे डोळे खराब होऊ शकतात. जेव्हाही उन्हात बाहेर पडाल तेव्हा चांगल्या क्वॉविटीचे सनग्लासेस लावा. डोळ्यांना युव्ही रेज प्रोटेक्शन मिळाल्याने अनेक समस्यांपासून डोळे वाचवू शकतील.
(दररोज आंघोळ केल्याचे मोठे दुष्परिणाम; आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक)
डोळे चोळणं
झोपेतून उठतांना किंवा डोळ्यात धूळ गेल्यावर डोळे जोरात चोळण्याची सवय बऱ्याचजणांना असते. यामुळे डोळ्यांना तात्पूरता आराम मिळतो.पण, यामुळे डोळ्यांच्या आतील आणि बाहेरील त्वचेचं बरंच नुकसान होऊ शकतं. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा नाजूक असते आणि आपण डोळे चोळतात तेव्हा खराब होऊ शकते. एवढंच नही तर,इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते.
(पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळ्या वेळी होते Sex ची इच्छा; चुकीच्या वेळी केल्यास…)
कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना निष्काळजीपणा
बरेच लोक चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर, आपल्या डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. इतकच नाही तर, बरेच लोक लेन्स न काढता झोपायलाही जातात जे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. हे केल्याने ऑक्सिजन डोळ्याच्या कॉर्नियावर पोहोचत नाही आणि जास्त ताणतणावामुळे बरेच नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्याला काही सवयी असतील तर, त्या बदलणं फार महत्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eyes damage, Lifestyle