नवी दिल्ली, 03 ऑक्टोंबर : देशात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. धार्मिक, श्रद्धावान लोक वर्षभर या सणासुदीची वाट पाहतात. आता काही दिवसांनी नवरात्री उत्सव सुरू होणार असून त्यानंतर दिवाळी येते. या काळात लोक अनेक उपवास (Healthy foods during fasting) करतात. उपवास करण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. उपवास केल्याने मन संतुलित राहते आणि एक शिस्त स्वतःमध्ये येते. उपवास ठेवण्यासाठी कठोर नियमांचे पालन करावे लागते. उपवास (fasting) विविध प्रकारे केला जातो. काही लोक नवरात्रीत नऊ दिवस काहीही न खाता उपवास करतात, तर काही लोक फक्त पाणी किंवा रस पिऊन उपवास करतात. बहुतेक लोक फळे आणि पाणी इतकाच आहार नवरात्र उपवास काळात घेतात. परंतु, फळे, दूध आणि पाण्याचे संतुलन नसल्यामुळे अशा लोकांना नंतर आरोग्याच्या अडचणी येतात. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, कॉस्मिक न्युट्राकोसचे संचालक डॉली कुमार म्हणतात की, उपवासादरम्यान अन्नाचे एक मानक निश्चित केले पाहिजे, जेणेकरून व्यक्तीला पोषक घटकांची कमतरता भासणार नाही आणि उपवासाचे नियमही पाळले जातील. उपवास करताना असे आरोग्यदायी पदार्थ बनवा केळी-अक्रोड शेक : केळी आणि अक्रोड शेक हा उपवासादरम्यान आरोग्यदायी आहार बनू शकतो. यासाठी केळी, ताक, अक्रोड आणि मध एकत्र करून ब्लेंडरमध्ये ठेवा आणि काही काळ ते ब्लेंड करा. तुम्ही तुमच्या चवीनुसार मध घालू शकता. नंतर शेक म्हणून सर्व्ह करा. हे वाचा - लोन घेण्यापूर्वी तुमच्याकडे ही कागदपत्र आहेत का तपासा, पगारधारक असो किंवा सेल्फ एम्प्लॉइड हे दस्तावेज महत्त्वाचे मध आणि नारळ : उपवासासाठी पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला चार घटकांची आवश्यकता असेल. शेंगदाणा बटर, मध, नारळाचे पीठ आणि नारळ. सर्वप्रथम मध आणि पीनट बटर चांगले मिसळा. यानंतर त्यात नारळाचे पीठ घाला. मग तुमच्या पद्धतीनुसार त्याचे गोळे बनवा आणि त्यावर नारळाचा खिस चिकटवा. त्यानंतर काहीवेळ ते फ्रीजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजमधून काढून ते सर्व्ह करा. हे वाचा - हावरटपणा भोवला; लग्नात जास्त केक खाणाऱ्यांना नवरी-नवरदेवानं पाठवले विचित्र मेसेज, पाहून पाहुणे हादरले ओट खीर : ओट खीर बनवण्यासाठी तुम्हाला ओट्स, तूप, दूध आणि ड्रायफ्रूट्स लागतील. चांगली चव येण्यासाठी प्रथम पॅन गरम करून त्यात तूप घाला आणि त्यात ओट्स थोडा वेळ तळून घ्या. त्यानंतर त्यात दूध घाला. ओट्स मऊ होईपर्यंत ते हलवत राहा. त्यात ड्राय फ्रूट्स घाला आणि ते नीट होईपर्यंत ढवळत राहा. तुम्ही ओट्स खीर गरम किंवा थंड खाऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.