मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Iron Deficiency: शरीराला लोह कमी पडतं, तेव्हा अशी लक्षणं दिसतात; या गोष्टींनी भरून काढा कमतरता

Iron Deficiency: शरीराला लोह कमी पडतं, तेव्हा अशी लक्षणं दिसतात; या गोष्टींनी भरून काढा कमतरता

Symptoms of Iron Deficiency: शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते, तेव्हा लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. लोहाच्या कमतरतेला अॅनिमियाही म्हणतात. विशेषत: महिलांना अनेकदा अॅनिमियाचा त्रास होतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 28 मार्च : शरीरासाठी लोह खूप महत्त्वाचं आहे. लोह शरीराला कमी पडलं तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. लोहाची कमतरता असल्यास माणसाला नेहमी थकवा जाणवतो, शरीरात ऊर्जेची कमतरता भासते. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते, तेव्हा लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. लोहाच्या कमतरतेला अॅनिमियाही म्हणतात. महिलांना अनेकदा अॅनिमियाचा त्रास होतो. विशेषतः गर्भधारणेदरम्यान शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास ते गुंतागुतीचे होते. लोहाच्या कमतरतेची कारणे, लक्षणे आणि मुख्य अन्न स्रोत जाणून घेऊया जेणेकरून त्याची कमतरता भासणार (Symptoms of Iron Deficiency) नाही.

लोहाच्या कमतरतेमुळे

हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते, परंतु शरीरात पुरेसे लोह नसते, त्यावेळी शरीरात लोह किंवा लोहाची कमतरता किंवा अशक्तपणा (iron Deficiency its food sources) जाणवतो. संभाव्य कारणांमध्ये पुरेसे लोहयुक्त पदार्थ न खाणं, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत रक्तस्त्राव आणि लोह शोषण्यास असमर्थता या गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शरीरात लोहाची तीव्र कमतरता आहे, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते रक्त तपासणीद्वारे अशक्तपणाचे निदान करू शकतात.

हे वाचा - डायबिटीज असेल तर उसाचा रस प्यायचा की नाही प्यायचा? इथं उत्तर जाणून घ्या

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

थकवा जाणवणे

शारीरिक कमजोरी

त्वचा पिवळसर होणे

धाप लागणे

चक्कर येणं

पायात मुंग्या येणे

जीभेला सूज किंवा वेदना

हात-पाय थंड पडणं

जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका

नखं निस्तेज, कमकुवत होणं

डोकेदुखी

हे वाचा - उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाण्याची पद्धत थोडी बदला; निरोगी राहाल, हीट होणार नाही

लोहाची कमतरता असल्यास काय खावं -

शरीरात लोहाची कमतरता असल्यास हिरव्या पालेभाज्या, पालक इत्यादींचे भरपूर सेवन करावे. त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय लाल मांस, सुका मेवा, लोहयुक्त तृणधान्ये, अंडी, बीन्स, सीफूड, भोपळ्याच्या बिया, मनुका इत्यादी गोष्टी दररोज खायला हव्यात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips