नवी दिल्ली, 26 मार्च : उन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स (Dry Fruits) उपयुक्त आहेत. ड्रायफ्रुट्स आपल्याला मेंदूपासून (Brain) हृदयापर्यंत (Heart) निरोगी ठेवण्यास मदत करतात. उष्णतेमुळे अनेकजण उन्हाळ्यात सुका मेवा खाणे टाळतात. हवामान कोणतेही असो, शरीर निरोगी ठेवण्यासाठी सुका मेवा खा. मात्र, उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स खाण्याची पद्धत काहीशी वेगळी असते. ड्रायफ्रुट्सचा प्रभाव खूप गरम असतो. त्यामुळे उन्हाळ्यात सुक्या मेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. उन्हाळ्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. असे केल्याने शरीर गरम होत नाही आणि आपण निरोगी देखील राहतो. उन्हाळ्यात कोणते ड्रायफ्रूट कसे खाल्ले पाहिजेत याविषयी (Eating Dry Fruits In Summer) जाणून घेऊ. उन्हाळ्यात बदाम कसे खावे बदामांमध्ये हीट असते. यामुळेच हिवाळ्यात बदाम जास्त प्रमाणात खाल्ले जातात. उन्हाळ्यात बदाम खायचे असतील तर ते भिजवून खा. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, बदामाची साल काढा आणि सकाळी खा. यामुळे बदामाचा उष्ण प्रभाव कमी होतो, ज्यामुळे उन्हाळ्यात त्रास होत नाही. प्रौढांनी उन्हाळ्यात दिवसातून 3 ते 4 बदाम खावेत. त्याच वेळी, उन्हाळ्यात मुलांना दिवसातून 2 पेक्षा जास्त बदाम खाऊ घालू नका. उन्हाळ्यात मनुका कसे खावे मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात अनेक प्रकारचे मनुके उपलब्ध आहेत ज्यात काळ्या मनुका, लाल मनुका आणि सोनेरी मनुका यांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या बेदाण्याची चव गरम असते. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी भिजवलेले मनुके खा. असे केल्याने मनुकाचा प्रभाव सामान्य होतो. पित्त प्रकृतीचे लोक मनुके भिजवून खाऊ शकतात. उन्हाळ्यात बेदाणे/मनुके कशी खायची बेदाण्यांमध्ये लोह, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. बेदाणे खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. पण उन्हाळ्यात मनुके भिजवल्यानंतरच खावीत. आयुर्वेदानुसार सर्व प्रकृतीचे लोक बेदाणे भिजवून खाऊ शकतात. याचा आरोग्याला फायदा होतो. मनुका पुरुषांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात, लहान मुलांना फक्त 2 भिजवलेले मनुके खायला द्या, तर प्रौढ दिवसातून 5 भिजवलेले मनुके खाऊ शकतात. हे वाचा - White hair : या कारणांमुळे लहान मुलांचे केस होतात पांढरे; जाणून घ्या सोपे उपाय उन्हाळ्यात अक्रोड कसे खावे अक्रोडमध्ये लोह, कॅल्शियम, तांबे आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अक्रोडमध्येही हीट असते, यासाठी हिवाळ्यात अक्रोड खाणं खूप फायदेशीर असतं. जर तुम्हाला उन्हाळ्यात अक्रोड खायचं असेल तर ते रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. मात्र, ते जास्त प्रमाणात खाणं टाळा. हे वाचा - घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची होते वाताहात उन्हाळ्यात अंजीर कसे खावे वाळलेले अंजीर फक्त हिवाळ्यातच खाता येतात असा बहुतेकांचा समज आहे. पण तुम्हाला हवे असल्यास उन्हाळ्यातही अंजीर खाऊ शकता. यासाठी अंजीर खाण्याच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. 1-2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर खा. वास्तविक अंजीरचा प्रभाव खूप गरम असतो, यामुळे शरीरातील पित्त वाढू शकतं. मात्र, भिजवून खाल्ल्याने त्याचे आरोग्य फायदे होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.