Home /News /lifestyle /

Depression Recovery: तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येताय! या 5 लक्षणांवरून स्वत:च ओळखू शकाल

Depression Recovery: तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येताय! या 5 लक्षणांवरून स्वत:च ओळखू शकाल

Signs of Depression Recovery : या उपायांचा वापर करत राहिल्यानं रुग्ण हळूहळू सामान्य जीवनात आल्यानंतर नैराश्यापासून मुक्त होतो. तुम्ही नैराश्यातून मुक्त होत आहात, हे कोणत्या आधारावर समजून घ्यावं, याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देऊ.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते आणि डिप्रेशनमध्ये (Depression) जाते, तेव्हा त्यातून सावरण्यासाठी तिला वेळ लागतो. मानसशास्त्रज्ञ तुम्हाला नैराश्यातून सावरण्यासाठी मदत करतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीत (Lifestyle) बदल केले जातात. अशा प्रकारे, स्वतःला नकारात्मकतेतून बाहेर काढून सकारात्मक जीवनात परत आणून, आरोग्य आणि प्रकृती दोन्हीमध्ये बदल घडू लागतात. या उपायांचा वापर करत राहिल्यानं रुग्ण हळूहळू सामान्य जीवनात आल्यानंतर नैराश्यापासून मुक्त होतो. तुम्ही नैराश्यातून मुक्त होत आहात, हे कोणत्या आधारावर समजून घ्यावं, याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देऊ. व्हेरीवेलमाइंडच्या मते, नैराश्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांची काही लक्षणं (Sign) आहेत; ज्यांचा मागोवा घेतल्यास तुम्ही स्वतःमध्ये होणारे सकारात्मक बदल समजू शकता. चला, जाणून घेऊया कोणती (Signs of Depression Recovery) आहेत ती लक्षणं. नैराश्यातून बरं होण्याची लक्षणं 1. आधीपेक्षा चांगलं वाटणं जर तुम्ही पूर्वीपेक्षा स्वच्छ मनानं विचार करू शकत असाल, तुम्हाला भूक लागत असेल, तुम्हाला मानसिक थकवा जाणवत नसेल किंवा तुम्हाला बाहेरच्या जगाबद्दल चांगलं वाटत असेल, तर ही नैराश्यातून सावरण्याची काही सकारात्मक लक्षणं असू शकतात. 2. दैनंदिन कामं करणं किंवा दिनचर्या पाळणं जर तुम्ही दररोज सकाळी ऑफिस किंवा कामासाठी तयार असाल, वैयक्तिक स्वच्छता राखत असाल, वेळेवर खात-पित असाल, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटत असाल, तर हे नैराश्यातून सावरण्याचं लक्षण असू शकतं. 3. कामात मन लागणं डिप्रेशनमध्ये कामावर लक्ष नसतं आणि मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. जे आधी काम करण्यात आणि ठरवलेलं लक्ष्य गाठण्यात आघाडीवर असायचे, त्यांची नैराश्यामुळं जीवनात, करिअरमध्ये पीछेहाट होऊ शकते. पण लोक नैराश्यातून सावरल्यावर ते कामावर पुन्हा एकदा अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात. हे वाचा -VIDEO – वयाच्या सातव्या वर्षी 4000 पुशअप्स मारून केला World record; आता सोळाव्या वर्षी त्याला ओळखणंही मुश्कील 5. कमी वैतागणं किंवा चीडचीड कमी होणं जसजशी एखादी व्यक्ती उदासीनतेतून बाहेर येते, तसतशी तिचा चीडचीडेपणा, वैतागलेल्या मनस्थितीत राहणं अशी लक्षणंही कमी होऊ लागतात आणि व्यक्ती विविध गोष्टींचा आनंद घेते आणि सामान्य व्यक्तींप्रमाणे हसूही शकते. हे वाचा - नियमित मशरूम खाण्याचे आहेत अनेक फायदे; नैराश्य, चिंता कमी करण्यात गुणकारी नैराश्याचा मागोवा कसा घ्यावा आपण दैनंदिनी लिहू शकता. रोजची नोंद बनवा आणि प्रत्येक दिवशी स्वतःत होणारे बदल लिहून ठेवा. तुमचं दिवसभरातील कामकाज जसं की व्यायाम, जेवण, लोकांना भेटणं, काम करणं आदी लक्षात ठेवा. एक प्रश्नपत्रिका बनवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नैराश्याची लक्षणं लिहा आणि दर आठवड्याला स्वतःचं परीक्षण करा. अधिकाधिक कामं आणि इतर उपक्रमांमध्ये गुंतण्याचा प्रयत्न करा आणि आपण किती आनंद घेत आहात ते पहा. अशा प्रकारे, आपण स्वत:ला सामान्य जीवनात आणण्याचा प्रयत्न करू शकता आणि नैराश्यापासून मुक्त होऊ शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Depression, Health, Health Tips, Lifestyle, Mental health

    पुढील बातम्या