जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सकाळी नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य-शांततेसाठी असं ठरतं फायदेशीर- रिसर्च

सकाळी नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य-शांततेसाठी असं ठरतं फायदेशीर- रिसर्च

सकाळी नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य-शांततेसाठी असं ठरतं फायदेशीर- रिसर्च

Benefits of Nature’s Sound For Health: निसर्गातील आवाज (Nature’s Sound) लोकांचे मानसिक आरोग्य राखण्यास मदत करू शकतात. या अभ्यासासाठी, बीबीसी मालिका फॉरेस्ट 404 चा (BBC series Forest 404) भाग म्हणून 7,500 हून अधिक लोकांचा डेटा गोळा करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 एप्रिल : आजच्या व्यग्र जीवनशैलीत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तज्ज्ञ यासाठी नेहमीच शारीरिक अॅक्टीविटी आणि ध्यान करण्याचा सल्ला देत आहेत. पण आता एका नव्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, निसर्गातील आवाज (Nature’s Sound) लोकांचे मानसिक आरोग्य राखण्यास मदत करू शकतात. या अभ्यासासाठी, बीबीसी मालिका फॉरेस्ट 404 चा (BBC series Forest 404) भाग म्हणून 7,500 हून अधिक लोकांचा डेटा गोळा करण्यात आला. बीबीसी मालिका फॉरेस्ट 404 ही एक पॉडकास्ट आहे, त्यांच्याकडून नैसर्गिक अधिवास नष्ट झालेल्या जगाचे चित्रण केले जाते. अभ्यासात असं दिसून आलं की, सहभागींनी पक्ष्यांच्या गाण्याच्या आवाजानं तणाव आणि मानसिक थकवा यापासून (Benefits of Nature’s Sound For Health) आराम मिळवला. एक्सेटर विद्यापीठातील (University of Exeter) प्रमुख संशोधक अॅलेक्स स्माली (Alex Smalley) म्हणतात, “लॉकडाउनमुळे लोकांना त्यांच्या सभोवतालच्या नैसर्गिक आवाजांचे महत्त्व आणि त्याची गरज पुन्हा ओळखण्यात मदत झाली. पशु-पक्षांसह नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य आणि शांतता या दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकते." निसर्गाकडून आपल्याला मिळणारे फायदे ओळखू चांगल्या भविष्यासाठी त्याचे जतन करण्याची गरज सगळ्यांनी ओळखली पाहिजे. निसर्गाकडून आपल्याला जे मिळते त्याची किंमत पैशात करता येत नाही. ते म्हणाले की, साध्या समुद्राच्या लाटा, पाऊस पडताना होणारा आवाजही आपल्याला वेगळा सकारात्मक परिणाम देऊन जातात. याबाबतची निरीक्षणे अभ्यासात नोंदवली आहेत. हे वाचा -  कॉफी पिणाऱ्यांसाठी खूशखबर! वजन कमी होण्यासह मिळतात इतके सगळे फायदे तज्ज्ञ काय म्हणतात निसर्गातील आवाज एखाद्याच्या मानसिक आरोग्यास कसे फायदेशीर ठरू शकतात. याविषयी फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम येथील मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान प्रमुख डॉ. कामना छिब्बर यांनी हेल्थशॉट्सशी बोलताना माहिती दिली. हे वाचा -  संत्र्यापेक्षा पाचपट व्हिटॅमिन सी असलेलं हे फळ उन्हाळ्यात खायला विसरू नका कामना छिब्बर यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर आणि कल्याणावर निसर्गाचा सकारात्मक प्रभाव पडतो. ही केवळ निसर्गाशी जवळीकच नाही, तर ते नैसर्गिक वातावरणाच्या गुणवत्तेबद्दल देखील आहे आणि कोणीही माणूस जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो तेव्हा निसर्गाचा आवाज ऐकत असतो, मग तो झाडांच्या पानांचा खळखळाट असो. पक्ष्यांचा किलबिलाट किंवा प्राण्यांचा आवाज, ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि एकूणच कल्याणासाठी उपयुक्त आहेत. तुम्हाला असेही वाटले असेल की जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असता तेव्हा तुम्हाला मिळणारा आनंद वेगळा असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात