मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Jaggery Tea Benefits : चहामध्ये साखरेऐवजी गूळ वापरण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Jaggery Tea Benefits : चहामध्ये साखरेऐवजी गूळ वापरण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

गुळात व्हिटॅमिन ए आणि बी, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, सुक्रोज, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. ती आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

गुळात व्हिटॅमिन ए आणि बी, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, सुक्रोज, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. ती आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

गुळात व्हिटॅमिन ए आणि बी, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, सुक्रोज, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. ती आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : अनेकांना चहा पिण्याची सवय असते. काही असे लोक आहेत, जे दिवसातून चार-पाच कपही चहा पितात. हिवाळ्यात चहाची ही सवय आणखी वाढते आणि मग लोकांना स्वतःलाही हे माहीत नसतं की, ते एका दिवसात किती कप चहा पितात. जास्त चहा पिणं फायदेशीर नाही. मात्र, आपण चहाला मोठ्या प्रमाणात फायदेशीर बनवू (Jaggery Tea Benefits) शकता. आता तुम्ही विचार करत असाल कसे? चहामध्ये साखरेऐवजी गूळ वापरला तर त्यातून बरेच फायदे मिळू शकतात.

गुळात व्हिटॅमिन ए आणि बी, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, सुक्रोज, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. ती आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊया गुळाच्या चहाच्या फायद्यांविषयी.

पचन चांगलं राहते

गुळाचा चहा प्यायल्यानं पचन चांगलं राहतं. यामुळे छातीत जळजळ होणं, गॅस तयार होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. याबरोबरच, गुळामध्ये कृत्रिम स्वीटनर फार कमी असते.

हे वाचा - shivsena dasara melava :…कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो,उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

रक्तच प्रमाण चांगलं राहतं

गुळाचा चहा प्यायल्यानं हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळं रक्ताची कमतरता दूर होते. गुळामध्ये भरपूर लोह आढळतं. ते शरीरातील रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं.

चरबी कमी होते

चरबी कमी करण्यासाठीही गुळाचा चहा उपयुक्त आहे. तो प्यायल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते. यासोबतच, शरीरात भरपूर कॅलरीज जात नाहीत कारण साखरेच्या तुलनेत गुळामध्ये खूप कमी कॅलरीज असतात.

हे वाचा - IPL Final : भारत-पाकिस्तान क्रिकेटसाठी सौरव गांगुलीचा मोठं पाऊल उचलण्याचा प्रयत्न, पण…

हाडं मजबूत होतात

गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे गुळाचा चहा प्यायल्यानं हाडं मजबूत होतात. तसेच, दैनंदिन वापर हाडांची खनिज घनता राखण्यास मदत करतो.

रक्तदाब नियंत्रणात ठेवतो

ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, गुळाचा चहा त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Tea, Tea drinker