नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : कधीही आपण व्यायाम (workout) सुरू करतो, तेव्हा दुसऱ्या दिवशी अंगदुखी सुरू होते, पण व्यायाम (pain after workout) सुरू केल्यानंतर होणारी ही सामान्य समस्या आहे. मात्र, यामुळे अनेकांचा व्यायाम करण्याचा सर्व उत्साह एक किंवा दोन दिवसात निघून जातो. जेव्हाही तुम्ही नव्यानं व्यायाम सुरू करता, तेव्हा स्नायू दुखणे सामान्य बाब आहे. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही लगेच व्यायाम करणे थांबवावे. व्यायामादरम्यान होणाऱ्या वेदना(pain after workout) कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याबाबत जाणून घेऊया.
मालिश करणे
व्यायामुळं अंगदुखी होत असल्यास आपण वेदनादायक भागाची मालिश करू शकता. यासाठी एकतर कुटुंबातील सदस्याला मालिश करण्यास सांगा किंवा आपण स्पावर देखील जाऊ शकता. यामुळे दुखणाऱ्या स्नायूंना आराम मिळेल.
बर्फ पॅक
हा एक असा उपाय आहे, ज्याचा जवळपास सर्वांसाठी उपयोग होऊ शकतो. जर वेदना जास्त असतील तर वेदनादायक भागावर बर्फाचा पॅक लावावा, त्यामुळे आराम मिळू शकतो.
पाणी पिणं महत्त्वाचं
चांगल्या आरोग्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही कसरत करता तेव्हा लक्षात ठेवा की अधेमधे पाणी प्या. या व्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही व्यायाम सुरू करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हिरव्या स्मूदी आणि फळांचे रस देखील प्यायला हवेत. व्यायाम करताना थोडा वेळ पाणी प्या पण जास्त प्रमाणात पिऊ नका.
हे वाचा - माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? Ajit Pawar यांचा सवाल
गरम पाण्याने आंघोळ
यामुळे स्नायूंना आराम मिळतो. वेदना दरम्यान, विशेषतः गरम पाण्याने आंघोळ करायला हवी. जर बाथ टब असेल तर त्यात सुगंधी तेलाचे काही थेंब टाका आणि बसून थोड्या वेळाने आंघोळ करा.
चेरीचा रस
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी चेरीचा रस नक्की प्यायला हवा. यातून भरपूर अँटीऑक्सिडंट्स शरीराला मिळतात, त्यामुळं स्नायूंना आराम मिळतो.
हे वाचा - …तर भारतात रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंद राहणार WhatsApp? जाणून घ्या काय आहे सत्य
व्यायाम हळूहळू सुरू करा
व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म-अप करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे व्यायाम करताना होणाऱ्या वेदना कमी होतात. या दरम्यान आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत आणि बाहेर सारखा ठेवा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Workout