जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Feet Sole Massage Benefits: रात्री पायाच्या तळव्यांना मालिश करण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Feet Sole Massage Benefits: रात्री पायाच्या तळव्यांना मालिश करण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Feet Sole Massage Benefits: रात्री पायाच्या तळव्यांना मालिश करण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Feet Sole Massage Benefits : तळव्यांचा मसाज केवळ शारीरिक तंदुरुस्तीतच नाही तर मानसिक बळकटीकरणासाठीही महत्त्वाचा आहे. मात्र, पायाच्या तळव्यांना मसाज केल्यानं चांगले परिणाम मिळविण्यासाठी, मसाजची योग्य पद्धत आणि योग्य तेल निवडणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याबद्दल (Feet Sole Massage Benefits) जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : सध्याच्या युगात बहुतेक लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायामासोबतच बॉडी मसाजकडे (Body Massage) जास्त लक्ष देतात. तसेच घरच्या घरी स्पापासून हेअर मसाजपर्यंत (Hair Massage) अनेक पद्धती वापरून पाहिल्या जात आहेत. पण, तज्ज्ञांच्या मते शरीर आणि डोक्याच्या मसाजसोबतच पायाच्या तळव्यांचा मसाजही खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पायाच्या तळव्याची मसाज (Feet Sole Massage) करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे माहीत आहेत का? तज्ज्ञांच्या मते, तळव्यांचा मसाज केवळ शारीरिक तंदुरुस्तीतच नाही तर मानसिक बळकटीकरणासाठीही महत्त्वाचा आहे. मात्र, पायाच्या तळव्यांना मसाज केल्यानं चांगले परिणाम मिळविण्यासाठी, मसाजची योग्य पद्धत आणि योग्य तेल निवडणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याबद्दल (Feet Sole Massage Benefits) जाणून घेऊया. तळव्याची मालिश कशी करावी पायाच्या तळव्याला मसाज करण्यासाठी आधी कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा. नंतर टॉवेलने पाय पुसून चांगले कोरडे करा. आता तेल गरम करून दोन्ही पायांच्या तळव्यावर लावा आणि तळव्यांना हातांनी मसाज करा. तळव्यांना लावलेले तेल पूर्णपणे कोरडे होईपर्यंत मालिश करत रहा. कोणते तेल वापरायचे तज्ज्ञांच्या मते, पायांच्या मसाजसाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. मात्र, भारतीय आयुर्वेदानुसार देशी तूप वापरण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे पायांना मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल किंवा देशी तूप यापैकी काहीही वापरू शकता. हे फायदे मसाजमुळे होतात चांगली झोप धावपळीची जीवनशैली आणि मानसिक तणावामुळं बऱ्याच लोकांना निद्रानाशचा त्रास होतो आणि झोपेच्या कमतरतेचा परिणाम आपल्या दैनंदिन कामांवर होऊ लागतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोहरीचे तेल थोडे कोमट करून तळव्यांना थोडा वेळ मसाज करू शकता. यामुळे तुमचा थकवा कमी होण्यासोबतच मानसिक स्थिरता अबाधित राहते. जेणेकरून तुम्हाला पुरेशी झोप मिळेल. तणाव दूर होईल व्यग्र जीवनशैलीत अनेक लोकांमध्ये तणाव आणि चिडचिडेपणा यांसारख्या समस्या दिसून येतात. तसेच दीर्घकाळ तणावामुळं काही लोक पुढं नैराश्यात जातात. अशा विविध समस्या होण्यापूर्वी त्यावर उपाय म्हणून तळव्यांचा मसाज तुमचा तणाव कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. हे वाचा -  किडनी खराब होऊ लागल्याची अशी असतात 4 लक्षणं; त्वचेवरील या बदलांकडे दुर्लक्ष नको सांधेदुखीपासून आराम मानसिक समस्यांसह तळव्यांच्या मसाजमुळे शारीरिक तंदुरुस्त राहण्यासही मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मसाज केल्यानं सांधेदुखीत खूप आराम मिळतो. सांधेदुखीच्या रुग्णांसाठी तळव्यांची मसाज खूप फायदेशीर ठरू शकते. चांगले रक्त परिसंचरण रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अनेकांना पूर्ण शरीर मालिश करायला आवडते. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तळवे मसाज करूनही शरीरातील रक्ताभिसरण सुधारू शकता. दररोज तळवे मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. हे वाचा -  तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर मासिक पाळी दरम्यान मालिश पायांच्या तळव्यांना मसाज करणं महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे. तळवे मसाज केल्याने, विशेषत: मासिक पाळी दरम्यान, तणाव आणि थकवा यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात