नवी दिल्ली, 12 एप्रिल : निरोगी राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला जिममध्ये जाऊन वर्कआऊट करता येत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही चालत जाऊन स्वतःला निरोगी ठेवू शकता. चालणं हा सौम्य व्यायामात येतो, परंतु त्याचा एकंदर आरोग्यास फायदा होतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करा किंवा चालणे, जॉगिंग किंवा धावणे, यामुळे शरीर आणि मन दोन्ही फिट राहतील. चालण्या-धावण्याचे अनेक प्रकार आहेत, खूप वेगाने चालणे, हळू चालणे किंवा खूप वेगाने धावणे किंवा खूप हळू चालणे. थोडक्यात गती बदलून चालण्या-धावण्याच्या या पद्धतीला ब्रिस्क वॉक (Brisk walk) म्हणतात. ब्रिस्क वॉक केल्याने स्मरणशक्ती सुधारली जाऊ शकते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. यासोबतच ब्रिस्क वॉक इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत, जाणून घेऊया. ब्रिस्क वॉकचे आरोग्य फायदे वजन नियंत्रणात- हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, ब्रिस्क वॉक करणे हा कार्डिओ व्यायाम आहे, जो नियमितपणे केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात. असे चालण्याने जास्त कॅलरी बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते. दुबळे स्नायू मजबूत होतात. मनःस्थिती सुधारते, ज्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि अधिक चालण्याची इच्छा होते. यामुळे आपण अधिक वजन कमी करण्याचे आपले ध्येय गाठू शकतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य तुम्ही दररोज ब्रिस्क वॉक करता तेव्हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. एका अभ्यासानुसार, आठवड्यातून 5 दिवस चालणे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. नियमित कार्डिओ व्यायामामुळे रक्तातील LDL (खराब) कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रण ब्रिस्क वॉक चालण्यासारखे कार्डिओ व्यायाम उच्च रक्तदाब कमी करू शकतात. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते. स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर इत्यादींचा धोका कमी होऊ शकतो. हे वाचा - Health Tips : डेली लाइफमध्ये किरकोळ बदल करून Bloating चा त्रास कमी करता येतो रक्तातील साखरेची पातळी मधुमेहाच्या रुग्णांनाही नियमितपणे ब्रिस्क वॉक केल्याने खूप फायदा होतो. हा व्यायाम रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही, इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवू शकतो. याचा अर्थ असा आहे की, व्यायामापूर्वी आणि नंतर उर्जेसाठी ग्लुकोज घेण्यासाठी आपल्या स्नायूंच्या पेशी इंसुलिनचा वापर चांगल्या पद्धतीनं करू शकतात. हे वाचा - उन्हाळ्यात सर्वांनाच नको-नकोसा असतो घाम; पण, शरीरासाठी इतकं महत्त्वाचं करतो काम मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा तुम्ही दररोज ब्रिस्क वॉक करत असता तेव्हा मानसिक आरोग्य सुधारू शकते. संशोधनात असेही दिसून आले आहे की, हा कार्डिओ व्यायाम केल्यानं आत्मविश्वास वाढतो, झोप सुधारते, मेंदूची शक्ती वाढते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.