मुंबई, 29 एप्रिल : उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. पण तुम्ही कधी गुलकंदचे सेवन केले आहे का? गुलकंदचे सेवन केल्याने आपल्याला उष्णतेपासून आराम तर मिळतोच पण अनेक समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. गुलकंद (Gulkand) दुधासोबत खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरतं, शिवाय आपण तसंही थेट खाऊ शकता. दुधासोबत खाण्याचे फायदे समजून (Summer health Tips) घ्या. जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या मुबलकतेमुळे दूध हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. तर गुलाबाच्या फुलांपासून बनवलेले गुलकंद खाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे गुलकंद दुधासोबत खाल्ल्याने त्याचे फायदे आणखी वाढतात. हेल्थसाइट नुसार गुलकंदचे फायदे जाणून घेऊया. अॅसिडिटीपासून आराम मिळेल - पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी गुलकंद दुधासोबत खाणे ही एक अतिशय प्रभावी कृती आहे. गुलकंद दुधात मिसळून प्यायल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. हे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते आणि आतड्यांसंबंधी प्रणालीचे योग्य कार्य करण्यास देखील मदत करते. गुलकंद तुम्ही थेट खाऊ शकता. ऊर्जा मिळते, फ्रेश वाटतं - गुलकंद खाल्ल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढते, कारण त्यात भरपूर साखर असते. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. एवढेच नाही तर गुलकंद खाल्ल्याने दृष्टीही सुधारते. हे वाचा - शुद्ध औषधी मसाला म्हणजे काळी मिरी; यामुळेच इंग्रजांचा ‘गुलाम’ राहिला भारत चांगली झोप येण्यासाठी - आजच्या व्यग्र दिनचर्येत कामाच्या दडपणामुळे ताणतणाव वाढवे आहेत. गुलकंदच्या कूलिंग इफेक्टमुळे मेंदूच्या मज्जातंतूंना आराम मिळतो आणि तुमचा ताण चुटकीसरशी नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे चांगली आणि शांत झोप लागते. हे वाचा - मे महिना या 5 राशीच्या लोकांसाठी राहील खास; नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग मुरुमे कमी होतात - उन्हाळ्यात ऊन, धूळ आणि माती यांमुळे चेहऱ्यावर मुरुमे येणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे. अशा स्थितीत गुलकंद खाल्ल्याने तुम्हाला पिंपल्सपासून सुटका मिळू शकते. वास्तविक, गुलकंद अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल घटकांनी समृद्ध आहे. मुरुमे किंवा मुरुमांचे डाग कमी करण्यास मदत करते. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.