मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खराब कोलेस्ट्रॉलसाठी या हेल्दी गोष्टी आहारात असाव्यात, हृदय विकारांची मग चिंता नाही

खराब कोलेस्ट्रॉलसाठी या हेल्दी गोष्टी आहारात असाव्यात, हृदय विकारांची मग चिंता नाही

कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो - 
घरगुती लोणचेच आणि तेही मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. कारण, बाजारात मिळणारे लोणचे तयार केले जाते तेव्हा ते चवदार बनवण्यासाठी त्यात जास्त तेल आणि जास्त मसाले वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्याचे साईड इफेक्टही होऊ लागतात. लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो - घरगुती लोणचेच आणि तेही मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. कारण, बाजारात मिळणारे लोणचे तयार केले जाते तेव्हा ते चवदार बनवण्यासाठी त्यात जास्त तेल आणि जास्त मसाले वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्याचे साईड इफेक्टही होऊ लागतात. लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Foods That Lower Bad Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळं आणि ते धमन्यांमध्ये जमा झाल्यामुळं धमन्या अरुंद होतात. यामुळं हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. अनेकदा धमनी अरुंद झालेल्या ठिकाणी एखादी रक्ताची गुठळी देखील तयार होऊ शकते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 02 मार्च : कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) दोन प्रकार आहेत, चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol). शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्यानं हृदयविकाराचा धोका (Heart Diseases) वाढतो. तर, चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोलेस्टेरॉल अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार करतं, ज्यामुळं शरीराचा विकास योग्य प्रकारे होतो. आपलं यकृत चरबीसारखा एक पदार्थ तयार करतं, ज्याला कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड म्हणतात. शरीरातील अनेक कार्यं पूर्ण करण्यासाठी कोलेस्टेरॉलचं प्रमाण पुरेसं असणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच, व्हिटॅमिन डी, पेशी यांच्यासह अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार करण्यास मदत होते. काही वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्यास अपायकारक स्निग्ध पदार्थांच्या जास्त सेवनामुळं शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं, ज्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शरीरात निरोगी आणि चांगलं कोलेस्टेरॉल असणं खूप महत्त्वाचं आहे. काही कमी कोलेस्ट्रॉलयुक्त (Low cholesterol foods) पदार्थांचं सेवन करून शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकता (Foods That Lower Bad Cholesterol) येईल.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळं आणि ते धमन्यांमध्ये जमा झाल्यामुळं धमन्या अरुंद होतात. यामुळं हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. अनेकदा धमनी अरुंद झालेल्या ठिकाणी एखादी रक्ताची गुठळी देखील तयार होऊ शकते. ज्यामुळं कोरोनरी धमन्यांमध्ये रक्त परिसंचरण अडथळा येतो. जर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर, आहारात शेंगांचा समावेश करा. त्यात हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात. हे एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

अॅवोकॅडो हे फळ वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी (लो कोलेस्ट्रॉल डाएट) नक्की खा. या फळामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. एवोकॅडोमध्ये फायटोस्टेरॉल असतात, जे शरीरातील एकूण आणि एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. या फळासोबत तुम्ही सफरचंद, द्राक्षे यासारख्या मोसंबीचंही सेवन करू शकता. लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेलं पेक्टिन हे एक विद्राव्य फायबर आहे.

हे वाचा - jaggery and gram benefits: मूठभर चणे आणि गूळ नियमित खा; आजारी पडणं विसरून जाल

काही बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, कठीण कवचाची फळं यांच्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी होतं. आहारात अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, बदाम, मोहरी यांचा समावेश करू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायबरने समृद्ध असलेली अखंड धान्यं खा, जी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात. विविध तृणधान्यं खाल्ल्यानं एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. आहारात बार्ली, ओटमील, ओट्स आदींचा समावेश करा.

हे वाचा - तेल लावताना या चुका टाळायला हव्यात; केसांच्या अनेक समस्या नंतर सुरू होतात

लसणातील अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्म खराब आणि टोटल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. याशिवाय, हिरव्या पालेभाज्या, तुरट-आंबट-गोड चवीची फळं खा. जास्त चरबीयुक्त पदार्थ, जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांचं सेवन कमी करा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips