जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची वाताहात होत जाईल

घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची वाताहात होत जाईल

घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची वाताहात होत जाईल

Vastu Tips: वास्तुशास्त्रामध्ये घराची रचना कशी असावी, कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात याविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण दिशेची विशेष काळजी घ्यावी लागते. दक्षिण दिशेला कोणत्या गोष्टी ठेवू नयेत याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 : वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घराचा प्रत्येक भाग योग्य दिशेला बनवला पाहिजे. पण, त्या बरोबरच एखाद्या जागी ठेवल्या जाणार्‍या वस्तूंची योग्य पद्धतीने निवड करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या गोष्टी चुकीच्या दिशेला ठेवल्या तर जीवनात खूप त्रास होतो. पैशाची हानी सुरू होते. त्यामुळे माणूस गरीब होतो, त्याची प्रगती थांबते. आपण घराची सजावट करत असाल किंवा घराची अरेंजमेंन्ट करत असाल तर नेहमी योग्य वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न (Vastushastra Tips) करा. दक्षिण दिशेची विशेष काळजी वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला पितरांचे स्थान मानले जाते. या ठिकाणी चुकीच्या गोष्टी ठेवल्या तर पितृ दोष जाणवतो. पितरांच्या नाराजीमुळे सुख, समृद्धी, आर्थिक स्थिती, मान-सन्मान, घराची प्रगती थांबते आणि जीवन दुःखाने भरून जाते. पितरांच्या नाराजीचा देखील संततीच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. याशिवाय दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला वस्तू अतिशय काळजीपूर्वक ठेवा. हे वाचा -  तुमचेही हात थरथरतात का? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण; या व्यायामांनी दिसेल फरक दक्षिणेला या वस्तू ठेवू नका दक्षिण दिशेला कधीही स्वयंपाकघर बनवू नका. या दिशेने स्टोअर रूम देखील न बांधण्याचा प्रयत्न करा. दक्षिण दिशेला देव्हारा बांधण्याची चूक कधीही करू नका. असं केल्यानं देवतांचा कोप होतो आणि जीवनात अनेक संकटं येऊ शकतात. याशिवाय घराच्या दक्षिण दिशेला बांधलेल्या देव्हाऱ्यात पूजा केल्यानं कोणतंही फळ मिळत नाही आणि मनोकामना पूर्ण होत नाहीत. हे वाचा -  सकाळी नीट पोट साफ होत नाही? कोणत्याही औषधांपेक्षा ही फळं खा, चांगला परिणाम दिसेल शूज-चप्पलदेखील दक्षिण दिशेला ठेवू नका. असं केल्यानं वडिलधारी लोक रागावतात. तसेच दक्षिण दिशेला यंत्रे ठेवणेही टाळावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा संपते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात