जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हृदय, फुफ्फुस निरोगी ठेवायचं असेल तर पोहायला निघा; Swimming चे हे फायदे आहेत जबरदस्त

हृदय, फुफ्फुस निरोगी ठेवायचं असेल तर पोहायला निघा; Swimming चे हे फायदे आहेत जबरदस्त

हृदय, फुफ्फुस निरोगी ठेवायचं असेल तर पोहायला निघा; Swimming चे हे फायदे आहेत जबरदस्त

पोहणे हा एक प्रकारचा एरोबिक व्यायाम आहे, जो हृदयाला शक्ती देतो, रक्त पंप करण्याची क्षमता वाढविण्यास मदत होते. पोहण्याचे हृदयाच्या आरोग्यासाठी इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया (How swimming is healthy for heart).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 एप्रिल : हृदय निरोगी (Heart health) ठेवायचे असेल तर पोहायला सुरुवात करा. पोहण्याने हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहते. हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या पोहण्याने कमी होतात. पोहण्याचे अनेक (swimming Benefits) आरोग्य फायदे आहेत, ज्यामध्ये वजन कमी होणे, स्नायूंचा टोन, हाडे मजबूत होतात, शरीराची ताकद-ऊर्जा वाढते. पोहणे हा एक प्रकारचा एरोबिक व्यायाम आहे, जो हृदयाला शक्ती देतो, रक्त पंप करण्याची क्षमता वाढविण्यास मदत होते. महिलांनी दररोज 30 मिनिटे पोहल्यास, हृदयविकाराचा धोका 30 ते 40 टक्क्यांनी कमी होतो. उच्च रक्तदाब कमी होऊन, चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत होते. पोहण्याचे हृदयाच्या आरोग्यासाठी इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया (How swimming is healthy for heart). निरोगी हृदयासाठी पोहण्याचे फायदे हृदय गती सुधारते TOI मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, इतर स्नायूंप्रमाणे आपले हृदय देखील एक प्रकारचे स्नायू आहे, ज्याला आपण पोहण्याने मजबूत करू शकतो. प्रत्येक ठोक्याने, हृदय रक्त पंप करते आणि संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा होतो. लोअर रेस्टिंग हार्टचे फायदे म्हणजे तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी असतो आणि जलतरणपटूंच्या हृदयाची गती 40 हृदयाचे ठोके प्रति मिनिट कमी असते. सरासरी व्यक्तीसाठी कमी लोअर रेस्टिंग हृदय गती 60-70 बीट्स प्रति मिनिट आहे. रक्तदाब कमी होतो पोहणे हा हृदयाला बळकटी देणारा एरोबिक व्यायाम आहे. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह जलद होतो. कमी रक्तदाब राखण्यासाठी, आपण दररोज 30 मिनिटे पोहणे आवश्यक आहे. अभ्यासानुसार, निरोगी हृदय राखण्यासाठी आठवड्यातून 2.5 तास व्यायाम करणे पुरेसे आहे. हे वाचा -  हाडांच्या दुखण्याला संधीवात समजण्याची चूक करू नका; हा गंभीर आजार झालेला असू शकतो दीर्घ श्वास घेऊ शकतो पोहण्यामुळे श्वसनाच्या समस्या दूर होतात. जे लोक पोहतात ते एका श्वासात सामान्य व्यक्तीपेक्षा वेगवान आणि लांब श्वास घेऊ शकतात. पोहण्याचा शरीराच्या मोठ्या स्नायू गटांना फायदा होतो. हृदय गती वाढवते, ज्यामुळे तुमचे फुफ्फुस अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात. तुम्ही जितके जास्त पोहता तितके तुमचा रक्तदाब आणि हृदय गती सुधारू शकते. हे वाचा -  Weight Loss : पोटॅशियमनं समृद्ध या पदार्थांचा आहारातील समावेश झटपट करेल वजन कमी रक्त परिसंचरण सुधारते पोहण्यामुळे तुमच्या हृदयाची गती सुधारते, ज्यामुळे शरीराला रक्तपुरवठा वाढतो. रक्ताभिसरणात वाढ झाल्यामुळे रक्ताभिसरण योग्य नसल्यामुळे ज्या भागात या समस्या जाणवतात त्या ठिकाणी सुन्नपणा आणि मुंग्या येणे ही समस्या कमी होते. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात