मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोल्डड्रिंक, आर्टिफिशियल स्वीटनर घातलेले पदार्थ खाणाऱ्यांनी लक्ष द्या; कॅन्सर झाल्यावर जागे व्हाल

कोल्डड्रिंक, आर्टिफिशियल स्वीटनर घातलेले पदार्थ खाणाऱ्यांनी लक्ष द्या; कॅन्सर झाल्यावर जागे व्हाल

Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers : जे लोक कृत्रिम स्वीटनर (artificial sweetener) असलेले पदार्थ जास्त खातात, त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका सुमारे 13 टक्के वाढतो. बर्‍याचदा कोल्ड्रिंक्सची चव वाढवण्यासाठी गोड पदार्थ मिसळले जातात, परंतु यामुळे कर्करोगाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 01 एप्रिल : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण खाण्यापिण्याबाबत अनेकदा दुर्लक्ष करत असतो. बाहेरचे कित्येक पदार्थ आपण कसलाच विचार न करता खात असतो, आपल्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक आहे. आपल्या दैनंदिन आहारात आपण अनेक प्रकारे कृत्रिम स्वीटनर असलेले पदार्थ खात असतो. उदाहरणार्थ, थंड पेय, योगर्ट आणि चीज इत्यादी. पण तुम्हाला माहित आहे का की, अशा प्रकारच्या कृत्रिम गोड पदार्थांमुळे आपल्या शरीरात कॅन्सरसारखे घातक आजारही होऊ शकतात? डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जे लोक कृत्रिम स्वीटनर (artificial sweetener) असलेल्या पदार्थ जास्त खातात, त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका सुमारे 13 टक्के वाढतो. बर्‍याचदा कोल्ड्रिंक्सची चव वाढवण्यासाठी गोड पदार्थ मिसळले जातात, परंतु यामुळे कर्करोगाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थच्या (French National Institute for Health) तज्ज्ञांनी सुमारे 1 लाख लोकांवर हा अभ्यास केला आहे, ज्यांचे सरासरी वय 42 वर्षे होते, ज्यामध्ये एक तृतीयांश महिलांचा समावेश (Artificial sweeteners in food-drink raise risk of cancers) होता. या अभ्यासादरम्यान, 8 वर्षांपर्यंत तज्ज्ञांनी त्यांच्या (1 लाख लोकांच्या) खाण्यापिण्याची तपासणी केली. सर्वात जास्त धोकादायक गोड पदार्थ म्हणजे अस्पार्टम (aspartame) आणि एसेसल्फेम-के (acesulfame-K), जे इंग्लंडसह अनेक देशांमध्ये थंड पेय, योगर्ट आणि चीजमध्ये घातले जातात. अभ्यासातून काय दिसले या संशोधनात असे समोर आले आहे की, 37 टक्के लोक सर्व काही माहीत असूनही दिवसातून एकदा कृत्रिम स्वीटनर वापरतात. याचा परिणाम असा झाला आहे की, अभ्यासाअंती 3358 लोकांना कर्करोग झाला होता. त्यांचे सरासरी वय 59 वर्षे होते. यामध्ये सर्वाधिक 22 टक्के म्हणजेच 2032 लोकांना लठ्ठपणाचा कर्करोग झाला आहे. तर 982 लोकांना स्तनाचा कर्करोग झाला. 403 जणांना प्रोस्टेट कर्करोग झाला. Aspartame आणि acesulfame-K मध्ये 200 पट जास्त गोडवा असतो. हे वाचा - सकाळी नैसर्गिक आवाज कानावर पडणं मानसिक आरोग्य-शांततेसाठी असं ठरतं फायदेशीर कॅन्सर रिसर्च यूकेच्या (Cancer Research UK) वरिष्ठ आरोग्य माहिती व्यवस्थापक फिओना ओस्गन यांच्या मते, कृत्रिम गोड पदार्थ आणि कर्करोग यांच्यात एक संबंध आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तेच कारणीभूत आहेत किंवा लोकांना ते टाळण्याचीच गरज आहे. आपण काय खातो आणि पितो हे आपल्या आहारातील घटकापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे - म्हणून अधिक फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खा आणि लाल आणि प्रक्रिया केलेले मांस आणि जास्त चरबी, साखर आणि मीठ कमी करा. हे वाचा - डायपर वापरताना अनेकजण या चुका करतात, त्याचा बाळाला त्रास सहन करावा लागतो कोण जास्त कृत्रिम स्वीटनर घेतं? किंग्ज कॉलेज लंडनचे (Kings College London) प्रोफेसर टॉम सँडर्स सांगतात की, ज्या स्त्रिया लठ्ठ आहेत किंवा वजन वाढलेले आहे, त्या कृत्रिम स्वीटनरचा अधिक वापर करतात, असं दिसून आलंय. पण हा धोका चांगल्या दिनचर्येने कमी करता येतो. आहार खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
First published:

Tags: Cancer, Health Tips

पुढील बातम्या