जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sprouted garlic: लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे

Sprouted garlic: लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे

Sprouted garlic: लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे

Garlic Health Benefits : आहारात अंकुरित लसणाचा (Sprouted garlic) समावेश करून आपण आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर (Garlic Health Benefits) मात करू शकतो. याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : आजकालच्या व्यग्र जीवनशैलीमुळं बहुतेक लोक योग्य आहार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पोषक तत्वांच्या (Nutrients) कमतरतेमुळं केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी झाल्यामुळं आपल्याला वेळेपूर्वीच अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. पण, आहारात अंकुरित लसणाचा (Sprouted garlic) समावेश करून आपण आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर (Garlic Health Benefits) मात करू शकतो. वास्तविक, अंकुरलेल्या लसणामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच त्यातील अँटी-ऑक्सिडंट घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. दुसरीकडे, ताज्या लसणापेक्षा जुन्या म्हणजे अंकुरलेल्या लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात. म्हणूनच तज्ज्ञ देखील अंकुरलेले लसूण खाण्याचा सल्ला देतात. ओन्लीमायहेल्थने दिलेल्या माहितीनुसार, अंकुरलेल्या लसणाचे काही खास फायदे आहेत, त्याविषयी जाणून घेऊया. कर्करोगामध्ये उपयुक्त कॅन्सर हा आज जगभरातील एक गंभीर आजार आहे. हा रोग जितका धोकादायक आहे तितकाच त्यावर उपचार करणं कठीण आहे. आहारातील लसणामुळे कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कर्करोगाचा सामना करण्यासाठी प्रभावी आहेत. लसूण हृदय निरोगी ठेवते अंकुरलेल्या लसणात एन्झाइम घटक आढळतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. दुसरीकडे अंकुरित लसूण आहारात दररोज घेतल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकार यांसारखे आजारही टाळता येतात. रोगप्रतिकारशक्ती अंकुरलेल्या लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यामुळेच लसणाचे सेवन केल्याने संसर्ग आणि विषाणू दूर राहण्यास मदत होते. हे वाचा -  Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात स्ट्रोकचा धोका कमी होतो शरीराच्या कोणत्याही भागात वारंवार रक्त जमा झाल्यामुळे पक्षाघाताचा धोका वाढतो. पण, भरपूर एन्झाइम्स असल्यामुळे लसणाचे सेवन स्ट्रोकची शक्यता कमी करण्यात प्रभावी ठरते. अंकुरलेल्या लसणात नायट्रेट्स आढळतात, त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्त गोठण्यास प्रतिबंधित करतात आणि शरीरात रक्त परिसंचरण सुधारण्याचे कार्य करते. हे वाचा -  फळं-भाज्या खरेदी करताना या सोप्या गोष्टी ध्यानात ठेवा; नेहमी मिळेल फ्रेश, ताजा माल लसणात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात आहारात लसणाचा समावेश करून आपण वृद्धत्वाचे परिणाम टाळू शकतो. यासोबतच सुरकुत्या, नखे आणि मुरुमांची समस्याही लसूण खाल्ल्याने कमी होऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात