मुंबई, 10 जून - गुलाबाच्या पाकळ्यांपासून केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतो. सतत लघवीचा त्रास होत असेल तर गुलकंद सेवन करावे. आयुर्वेदातही गुलकंदाला महत्त्व देण्यात आलं आहे. गुलकंदात व्हिटॅमिन सी, ई आणि बी हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास आणि शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर ठरतं. असं तयार करा गुलकंद - साहित्य - गुलाबाच्या पाकळ्या 200 ग्राम, साखर 100 ग्राम, वेलदोडे पूड 1 टीस्पून, बडीशेप 1 टीस्पून कृती - गुलकंद तयार करण्यासाठी लाल गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करावा. गुलाबाच्या पाकळ्या धुवून काचेच्या बरणीत ठेवा. त्यानंतर त्यात साखर, वेलदोडे पूड, बडीशेप मिसळून झाकण लावा. ही बरणी 10 दिवस उन्हात ठेवा. अधून-मधून हे मिश्रण हलवत राहा. जेव्हा गुलाबाच्या पाकळ्या मऊ झाल्यात असं दिसेल तेव्हा गुलकंद तयार झालं असं समजावं. ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या फायदे गुलकंदाचे फायदे - 1 - गुलकंद पाचक असून, ताप, कांजिण्या, रक्तपित्त, अशक्तपणा तसंच उष्णतेपासून होणाऱ्या आनेक विकारांवर उपचारासाठी गुलकंदाचा चांगला उपयोग होतो. 2 - गुलकंदामध्ये 10 टक्के प्रवाळ मिसळून वाढत्या वयाच्या मुलांना किंवा शारीरिक दौर्बल्य असलेल्यांना ते दिल्यास शक्तिवर्धक म्हणून काम करतं. 3 - गुलकंद कांतिदायक आणि तृष्णाशामक आहे. 4 - गरोदर महिलांनी गुलकंद सेवन केलं तर गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 5 - तोंड आल्यानंतर गुलकंद सेवन केल्याने बऱ्यापैकी आराम पडतो. उत्तम शरीरयष्टी कमवायची असेल तर ‘हा’ संतुलित आहार तुम्ही घ्यायलाच हवा 6 - गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होतं आणि त्वचा उजळते. तसंच ब्लॅकहेड्स आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. 7 - गुलकंद सेवनाने हिरड्यांवरची सूज कमी होते. 8 - उन्हात फिरल्याने अनेकांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो. ही समस्या दूर करण्यासाठी गुलकंद उत्तम ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.