मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमची फक्त ही एकच सवय आहे दीर्घायुष्य जगण्याचा मंत्र

तुमची फक्त ही एकच सवय आहे दीर्घायुष्य जगण्याचा मंत्र

ब्राम्हीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत.

ब्राम्हीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत.

वय, शिक्षण, गंभीर आजार, नैराश्य, दारूचं व्यसन, डाएट आणि प्राथमिक काळजी या सगळ्या मुद्यांचा अभ्यास करून संशोधकांनी हा निष्कर्ष नोंदवला आहे.

    मुंबई, 19 मार्च : आपल्या आजूबाजूला आपण अनेक प्रकारचे लोक बघत असतो. काही अगदी वयोवृद्ध व्यक्तीही (Senior Citizen) आनंदाने आपलं आयुष्य जगत असताना आपण पाहतो. अशा व्यक्ती इतरांनाही प्रेरणा देतात. आयुष्याच्या या वळणावर अशी कोणती शक्ती यांना इतकी ऊर्जा देते असा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडतो. याचं उत्तर दिलं आहे दी बॉस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन (The Boston University School of Medicine) या संस्थेनं एका अभ्यासाद्वारे दिलं आहे. या संस्थेनं म्हटलं आहे की माणसाचा सकारात्मक दृष्टीकोन (Positive attitude) त्याला आनंदी ठेवतो एवढेच नव्हे तर त्याचं आयुष्यही (Life) वाढवतो.

    माणसाच्या दीर्घ आयुष्याचं नातं त्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाशी जोडलेलं आहे. सकारात्मक वृत्तीनं जगणाऱ्या लोकांचे आयुष्य 85 वर्षांहून अधिक असतं, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

    ‘एक्स्प्रेसडॉटकोडॉटयुके’शी बोलताना डॉ. लेविना म्हणाल्या, या अभ्यासात 69 हजार 744 महिला आणि 1429 पुरुषांना सहभागी करण्यात आलं होतं. त्यांनी आपला सकारात्मक दृष्टीकोन, आरोग्याच्या सवयी याबाबत सर्व माहिती या सर्वेक्षणात दिली. सहभागी महिलांचा दहा वर्षांच्या कालखंडातील वैचारिक सवयी, आरोग्य आदी बाबी बघण्यात आल्या. तर पुरुषांच्या बाबतीत याच बाबी तीस वर्षांपर्यंत पडताळल्या गेल्या. प्राथमिक पातळीवर असं आढळून आलं की आनंदी, हसतमुख लोकांचे आयुष्य सामान्य लोकांपेक्षा सरासरी 15 टक्के जास्त असतं. या अभ्यासानुसार, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगणारे जवळपास 70 टक्के लोक 85 वर्षांहून अधिक वयापर्यंत जगण्याची शक्यता खूप अधिक असते. वय, शिक्षण, गंभीर आजार, नैराश्य, दारूचं व्यसन, डाएट आणि प्राथमिक काळजी या सगळ्या मुद्यांचा अभ्यास करून संशोधकांनी हा निष्कर्ष नोंदवला आहे.

    हे वाचा - जगण्याचा खूप वैताग आलाय? जाणून घ्या कसं बनायचं स्वत:चाच बेस्ट फ्रेंड?

    क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉक्टर ली म्हणाले, ‘अनेक अभ्यासांमध्ये अकाली मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यात आला आहे. काही साध्या गोष्टी आणि थेरपीचा वापर करून माणसाचा दृष्टीकोन सुधारता येऊ शकतो, ही विशेष बाब आहे.

    या अभ्यासातील सहाय्यक डॉ. लॉरा कुबाजान्स्की म्हणाल्या, ‘आशावादी दृष्टीकोन असणारे लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या भावना आणि वर्तन यांची योग्य हाताळणी करण्यात सक्षम असतात. या लोकांच्या आरोग्यदायी सवयीही (Healthy Lifestyle) त्यासाठी पूरक ठरतात. हे लोक नियमितपणे व्यायाम (Exercise) करतात, धूम्रपान कमी करतात. अशा अनेक चांगल्या सवयी त्यांचं आयुष्य वाढवतात.

    हे वाचा - एक Blood test वाचवू शकते कोरोना रुग्णांचा जीव; संशोधकांचा दावा)

    राष्ट्रीय आरोग्य सर्वे (NHS) संस्थेनं रोजच्या आयुष्यात आनंदी, सकारात्मक राहण्यासाठी सहा टिप्स दिल्या आहेत. ताण कमी करून लोक आपलं रोजचं आयुष्य अधिक आनंदी बनवू शकतात. व्यायामाच्या मदतीनं ही ताणतणावावर (Stress) नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. श्वसनाचे व्यायाम आणि वेळेचं नियोजन याच्या सहायानं आपण तणावमुक्त राहू शकता. भावनिकदृष्ट्या आनंदी राहण्यासाठी त्या सर्व गोष्टी जरूर करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो. मित्रमंडळीना भेटा, पावसात भिजा, खेळ बघा किंवा खेळा अशा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी बिनदिक्कत करा. योग्य आहार जेवणखाण वेळेवर घ्या, झोप योग्य प्रमाणात घ्या, आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करा. वृद्धापकाळातील तुमचं आयुष्य नक्कीच आनंदाचं ठरेल आणि उत्तम दीर्घायुष्य लाभेल.

    First published:

    Tags: Fitness, Health, Health Tips, Lifestyle, Positive thinking, Wellness