पिवळा भोपळा तर बहुतेकांनी खाल्ला असेल. परंतु आज तुम्हाला पांढऱ्या भोपळ्या विषयी सांगणार आहोत. पांढरा भोपळा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून अनेक आजारांवर देखील तो गुणकारी आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, फोलेट, नियासिन आणि थायामिन यांसारखे पोषक घटक आढळतात. बॉडी डिटॉक्स : पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस शरीर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतो. अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेला पांढरा भोपळा शरीरातील दूषित पदार्थ काढून टाकतो आणि बॉडी डिटॉक्स करतो.
पचनक्रिया : पांढरा भोपळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यायल्याने शरीरात चांगले बॅक्टेरिया तयार होण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बॉडी हायड्रेट : पांढरा भोपळ्याचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. यामुळे शरीरात थंडावा राहतो. Nails Shape : नखांच्या आकारावरून कळतो व्यक्तीचा स्वभाव, कसं ते जाणून घ्या वाईट कोलेस्ट्रॉल कंट्रोल करा : पांढरा भोपळा शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून शरीरातील चांगला कोलेस्ट्रॉल राहण्यास मदत करतो. पांढऱ्या भोपळ्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म दमा आणि सांधेदुखीमध्ये फायदेशीर आहेत.