नखांमध्ये गोलाकार, चौकोनी, गोलाकार चौकोनी, ओव्हल, बदामाच्या आकार दिसून येतात. अनेकदा तुमच्या नखाचा आकार आणि तुमचा स्वभावातील वेगळेपण ही तुमची वेगळी ओळख ठरू शकते.
लांब नखे : नैसर्गिकपणे लांब आकाराची नखे असलेल्या व्यक्ती या स्वभावाने अतिशय प्रेमळ असतात. तसेच लांब नखांच्या व्यक्ती या क्रिएटिव्ह असून त्यांच्याकडे काम कौशल्याने करण्याचे कसब असते. शिवाय त्या खूपच रोमॅंटिक असल्यामुळे त्या एक चांगल्या जोडीदार असू शकतात.
आखूड नखे : ज्या व्यक्तींची नख कमी उंचीची आणि रुंद आकाराची असतात अशा व्यक्ती निरोगी असतात. आखूड नखे असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आरोग्याबाबत सतत जागरूक असतात. ज्यांचे विचार अगदी स्पष्ट आणि बोलण्याची पद्धत अगदी रोखठोक असते. त्यांचे हात शक्तीशाली असल्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची ताकद इतरांपेक्षा अधिक असते.
चौकोनी नखे : ज्या व्यक्तींच्या नखाचा आकार हा चौकोनी असतो अशा व्यक्ती स्वभावाने कठोर असतात. इतरांना वेळप्रसंगी अधिकारवाणीने बोलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. लोकसमूह निर्माण करण्याची आणि नेतृत्व करण्याची आवड त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे ते टीमलीडर म्हणून चांगले काम करू शकतात.
ओव्हल शेप नखे : काही लोकांच्या नखांचा आकार हा लांबट गोल किंवा अंडाकृती असतो. अशाप्रकारची व्यक्ती ही अबोल असते. ज्यांना इतरांमध्ये मिसळणे, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, पार्टीला जाणे मुळीच आवडत नाही. कुटुंब आणि स्वतःवर अधिक प्रेम असल्याने अशा व्यक्ती कुटुंबवत्सल असतात. अशा व्यक्ती व्यवसाय करण्यापेक्षा नोकरीमध्ये जास्त रमतात.
बदामी शेप नखे : बदामी शेपच्या आकाराची नखे ही टोकाकडे निमूळती असतात. ज्यामुळे त्यांच्या नखांचा आकार बदाम सारखा दिसतो. बदामी आकाराची नखे असणारी माणसे इतरांशी सलोख्याने वागतात. दुसऱ्यांच्या मनाचा विचार स्वतःपेक्षा जास्त करतात. ज्यामुळे अशा लोकांशी केलेली मैत्री आयुष्यभर टिकते.