मुंबई, 20 नोव्हेंबर : वजन वाढेल या विचाराने बरेच लोक तुपाचे सेवन करत नाहीत. तुपाने शरीरात चरबी वाढू लागेल असे अनेकांना वाटते, परंतु तसे नाही. शरीराच्या गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणात काहीही खाल्ले तर कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तुपाच्या बाबतीतही तेच आहे. हिवाळ्यात जेवणात तूप वापरल्याने जेवणाची चव तर दुप्पट होतेच, शिवाय आरोग्यालाही फायदा होतो. हिवाळ्यात तूप खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. हेल्दी फॅट असण्यासोबतच शुद्ध देशी तुपात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता देखील असते.
आयुर्वेदातही हिवाळ्यात तूप खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण तूप शरीराला आतून उबदार ठेवतं. तूप शरीराला शक्ती देतं. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, स्मरणशक्ती वाढवते, त्वचा निरोगी ठेवते. तसेच शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. एवढेच नाही तर हिवाळ्यात वारंवार खोकला आणि सर्दी होत असेल तर त्यावरही फायदा होतो. याशिवाय हिवाळ्यात तूप खाण्याचे काय फायदे आहेत आणि त्याचे सेवन कसे करावे, हे जाणून घेऊ.
हिवाळ्यात तूप खाण्याचे फायदे -
1. Hindustantimes.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, देशी तुपाचे सेवन हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवते. तुपाचा उच्च स्मोक पॉइंट थंड हवामानात स्वयंपाक करण्यासाठी आदर्श ठरतो. त्याची चव आणि सुगंध देखील इतका चांगला असतो की, जेवणाची चव दुप्पट होते. गरम रोट्यावरही तूप लावू शकता. तसेच भाजीमध्येही वापरता येते.
2. तुपाचे सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारते. तुपातील पोषक तत्त्वे गॅस्ट्रिक पचन सुधारण्यास मदत करतात. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये एंजाइम असतात, जे अन्नाला साध्या संयुगांमध्ये मोडण्यास मदत करतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही गरम भाकरी खाता तेव्हा एक छोटा चमचा तूप लावा. यामुळे रोटी मऊ तर होईलच, शिवाय मल पास करणेही सोपे होईल. आतड्याची हालचालही योग्य राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
3. हिवाळ्यात लोकांना खोकला, सर्दी, पडसं यांचा खूप त्रास होतो. थंड हवेत घराबाहेर पडल्याने अनेकांना ताप येतो. नाक वाहू लागतं. तुपामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, ते सर्दी आणि खोकला बरे करण्यासाठी प्रभावी आहेत. कोमट शुद्ध गाईच्या तुपाचे काही थेंब नाकपुडीत टाकल्यास त्वरित आराम मिळू शकतो.
4. हिवाळ्यात त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते. त्वचा कोरडी, निस्तेज होते. तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जेव्हा तुम्ही त्वचेवर तूप लावता तेव्हा ते त्वचेच्या पडद्याला आतून आणि बाहेरून आर्द्रता प्रदान करतं. तूप हे आवश्यक फॅट्सचे बनलेले असते, ज्यामुळे त्वचा मऊ, कोमल, गुळगुळीत होते. केसांना तूप लावण्यासोबतच कोरडी स्कॅल्प आणि केसांनाही ओलावा मिळतो.
आहारात तुपाचा असा समावेश करा -
जर तुम्हाला हिवाळ्यात तूप खाण्याचे फायदे माहित झाले असतील तर त्याचा आहारात नक्की समावेश करा. तूप लावून गरम भाकरी खाऊ शकता, पण प्रमाणाची काळजी घ्या. भाजी करण्यासाठी रिफाइंड तेलाऐवजी तूप वापरा. तुपामध्ये उच्च उष्णता बिंदू आहे, ज्यामुळे ते भाज्यांमध्ये आढळणारे चरबी-विरघळणारे पोषक घटक शोषण्यास चांगले बनवते.
हे वाचा - जेवण झाल्यावर फक्त 15 मिनिटं करा हे आसन, अजिबात वाढणार नाही बेली फॅट
भाजी तेलाऐवजी तुपात करू शकता. तूप टाकून डाळ करा. कोणतेही खास पदार्थ बेक करण्यासाठी लोण्याऐवजी तूप वापरा. जर तुम्ही घरी पॉपकॉर्न, ओटमील, पॅनकेक बनवत असाल तर लोणी आणि चीज ऐवजी तूप वापरा. सकाळच्या चहा किंवा कॉफीमध्येही तूप घालू शकता. सूप, डाळ, शिजवलेला भात, क्विनोआ किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थात तूप घालून तुम्ही अतिरिक्त चव आणि पौष्टिकता वाढवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ghee, Health, Health Tips