मुंबई, 30 एप्रिल : सध्या देशाच्या सर्वच भागांत तीव्र उष्मा जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. या कालावधीत सहाजिकच थंड पेय पिण्याकडे लोकांचा कल वाढतो. त्यामुळे लिंबू सरबत, फळांचे ज्युस, ताक, नीरा आदी पेय लोक आवर्जून पितात. उष्मापासून दिलासा मिळावा आणि शरीर हायड्रेट राहवं या साठी ही पेय प्यायली जातात. उन्हाळ्यात ताजी नीरा पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पामच्या झाडापासून मिळणारी नीरा ही काहीशी पांढऱ्या रंगाची असते. ती चवीला गोड असते. तिच्यावर आंबवण्याची क्रिया केली जात नसल्याने त्यात मद्यार्क नसतो. नीरा ही जशी आरोग्याला फायदेशीर असते तसेच तिचे काही दु्ष्परिणाम असतात, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. पाम ताडी हे खजूर, नारळ आदी विविध पाम वृक्षांच्या रसांपासून बनवलेले अल्कोहोलयुक्त पेय आहे. दक्षिण भारतात याला पाम वाईन तर उत्तर भारतात ते नीरा नावाने ओळखले जाते. पण बाजारात उपलब्ध होणारी नीरा ही अल्कोहोलयुक्त नसते आणि आरोग्याला पोषक असते. ती शिंदीच्या झाडापासून मिळते. ताडी हे पेय भारतात विशेषतः केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. पहाटेच्या वेळी लोक ताडी गोळा करतात. त्यावर किण्वनची प्रक्रिया केली तर ते अल्कोहोलिक पेय बनते. याला पाम वाईन असंही म्हणतात. किण्वन प्रक्रियेमुळे तिची चव काहीशी आंबट असते. यात यीस्ट, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, साखर, प्रोटीन, अमिनो अॅसिड्स, व्हिटॅमिन सी, बी 1, बी2 आणि बी 6 हे पोषक घटक असतात. नीरा तयार करताना त्यावर किण्वन प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे ती अल्कोहोलिक पेय होत नाही. त्यामुळे नीरा ही शरीरासाठी फायदेशीर असते. पण जास्त प्रमाणात नीरा प्यायल्याने शरीरावर काही दुष्परिणाम दिसू शकतात. हेही वाचा - लघवीचा रंगही देतो मधुमेहाचे संकेत, ही 3 लक्षणं दिसल्यास समजून जा, परिस्थिती आहे गंभीर!
नीरा जास्त प्रमाणात प्यायल्यास लिव्हर खराब होऊ शकतं. यात इथेनॉलचा समावेश असल्याने, गर्भवती महिलेच्या शरीरातील लिपिड मेटाबॉलिझमवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे लिव्हरमध्ये फॅट्स साचून राहतात आणि त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. नीरा जास्त प्रमाणात प्यायल्यास ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. हे शरीरात अल्कोहोल प्रमाणे कार्य करते. जास्त नीरा प्यायल्यास एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त गोठण्याची नैसर्गिक क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे अनियंत्रित रक्तस्राव होऊ शकतो. अतिप्रमाणात नीरा प्यायल्याने हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि रक्ताचं पंपिंग करणं कठीण होऊ शकतं.
योग्य प्रमाणात नीरा प्यायल्यानं आरोग्याच्या सामान्य तक्रारी दूर होऊ शकतात. फ्लू किंवा साधी सर्दी बरी होऊ शकते. यामुळे खोकला आणि शिंक येणं यासारख्या समस्या दूर होतात. नीरेत आयर्न आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते. हे घटक त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात. शरीरातील विविध पेशींचे कार्य योग्य रितीने होणं खूप महत्त्वाचं असतं. निरेमुळे शरीरातील पेशींचे दोष दूर होतात. तसंच यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. यामुळे पेशी निरोगी होतात. महिलांनी त्वचा आणि त्वचेचा रंग उजळण्यासाठी अधूनमधून नीरा पिणं गरजेचं आहे. हेही वाचा - घरातल्या ‘या’ दोन वस्तू वापरून प्लॅस्टिकच्या बाटल्या करा झटपट स्वच्छ!
डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य प्रमाणात नीरा पिणं आवश्यक आहे. यात अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन सी असतात. याला एस्कॉर्बिक अॅसिड असंही म्हणतात. नीरेत बी1 हा घटक असतो. हा घटक थायमिन नावनंही ओळखला जातो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी चांगली होते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लोकांनी ताजी नीरा पिणं आवश्यक आहे. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील लोक रोज नीरा पितात.
आफ्रिकेतील बहुतांश भागात नीरा हा आरोग्याविषयक समस्यांवर नैसर्गिक उपाय मानला जातो. नीरेमुळे नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांमधील दूध निर्मितीची क्षमता वाढते. घाना, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये आरोग्यासाठी नीरेचा वापर केला जातो. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी माफक प्रमाणात नीरा पिणं फायदेशीर ठरू शकतं, असं अनेक अभ्यासांतून दिसून आलं आहे. निरेमुळे हार्ट फेल्युअर आणि कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीजचा धोका कमी होतो. निरेत पोटॅशियम असतं. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहून हृदयाचं आरोग्य सुधारतं. मात्र प्रमाणापेक्षा जास्त निरा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. निरेत बी 2 व्हिटॅमिन असते. याला रायबोफ्लेवीन असंही म्हणतात. हे एक अँटिऑक्सिडंट असून, ते कॅन्सरसाठी कारणीभूत मानल्या जाणाऱ्या फ्री रॅडिकल्सविरुद्ध शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत करतं. कर्करोग प्रतिबंधक औषध म्हणून आशिया, आफ्रिका, मेक्सिको, फिलिपिन्स आणि घानामधील लोक नीरा पितात.

)







