जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घरातल्या 'या' दोन वस्तू वापरून प्लॅस्टिकच्या बाटल्या करा झटपट स्वच्छ!

घरातल्या 'या' दोन वस्तू वापरून प्लॅस्टिकच्या बाटल्या करा झटपट स्वच्छ!

Plastic Bottle

Plastic Bottle

बाजारात पाणी साठवण्यासाठी प्लॅस्टिकच्या अनेक आकर्षक बाटल्या उपलब्ध असतात. पण जास्त वापर केल्याने त्या घाण होतात तेव्हा स्वच्छ कशा करायच्या हा प्रश्न असतो. तेव्हा आपल्या स्वयंपाक घरातील या दोन वस्तू वापरून बाटली स्वच्छ करू शकता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 एप्रिल- उन्हाळ्यात सतत पाणी प्यावंसं वाटतं. बाहेर जाताना प्रत्येकवेळी सोबत पाण्याची बाटली ठेवावी लागते. बाजारात पाणी साठवण्यासाठी प्लॅस्टिकच्या अनेक आकर्षक बाटल्या उपलब्ध असतात. स्टील किंवा तांब्यापासून बनवलेल्या बाटल्याही उपयुक्त असतात. मात्र त्यांची किंमत जास्त असते. प्लॅस्टिकची बाटली हलकी व स्वस्त असल्यानं त्याचा जास्त वापर होतो. असं असलं तरी या बाटल्या वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं असतं. त्यासाठी या टिप्स जाणून घ्या. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर सर्रास होण्यामागे खास कारणं आहेत. या बाटल्या स्वस्त असल्यानं विसरल्या किंवा हरवल्या तरी फारसं नुकसान होत नाही. तसंच या बाटल्या हलक्या असल्यानं पाणी संपल्यावरही त्यांचं ओझं वाटत नाही. या बाटल्या उपयुक्त असल्या तरी त्या वापरण्यात काही समस्या असतात. या बाटल्यांची स्वच्छता करणं अवघड असतं. तसंच रोजच्या रोज स्वच्छ न केल्यास त्यातून दुर्गंध येऊ लागतो. अशा बाटलीतून पाणी पिणं आरोग्याला घातक ठरू शकतं. त्यासाठी या बाटल्या दिवसातून एकदा कोमट पाण्यानी धुणं गरजेचं असतं. तसंच प्लॅस्टिक बाटल्या आठवड्यातून एकदा आतून-बाहेरून स्वच्छ केल्या पाहिजेत. वाचा- सिगारेटच्या धूराने त्वरित प्रसन्न होणारे श्री शंकर महाराज! मठ- धनकवडी, पुणे व्हिनेगर व बेकिंग सोडा खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा उपयोग केला जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी या दोन गोष्टींचा उपयोग होतो. 2 चमचे व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळावा. हे मिश्रण बाटलीमध्ये भरून 20 मिनिटं तसंच ठेवावं. त्यानंतर बाटली हलवून चिकटलेला मळ काढून टाकावा. मग ते पाणी टाकून द्यावं. बाटली स्वच्छ पाण्यानं धुवावी. याशिवाय गरम पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यानंही बाटली स्वच्छ करता येते. व्हिनेगर व बेकिंग सोडा

    व्हिनेगर व बेकिंग सोडा

    प्लॅस्टिक पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठीही घातक असतं. त्यामुळे त्याचा कमीतकमी वापर करणं हिताचं ठरतं. पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी काच, स्टील, तांबे किंवा मातीच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करावा. मात्र या बाटल्या घेणं शक्य नसेल आणि प्लॅस्टिकची बाटली वापरत असाल, तर ती वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे. शक्यतो वर्षातून एकदा ही बाटली बदलावी.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तसंच वारंवार स्वच्छ करूनही बाटलीतून दुर्गंध येत असेल, तर ती बाटली वापरू नये. प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये खूप काळ पाणी साठवून ठेवू नये. तसंच वापरात नसेल तेव्हा बाटली कोरडी करून ठेवावी. प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरताना स्वच्छतेबाबतचे हे नियम पाळल्यास आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता कमी होऊ शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात