सावधान! तुम्हीही भेसळयुक्त पदार्थ तर खात नाही ना? कशी ओळखाल दूध, तांदूळ, तिखट, मसाल्यातली भेसळ?

सावधान! तुम्हीही भेसळयुक्त पदार्थ तर खात नाही ना? कशी ओळखाल दूध, तांदूळ, तिखट, मसाल्यातली भेसळ?

तुम्ही घरच्या घरी अन्नपदार्थांची पारख करू शकता. कसं करायचं परीक्षण? वाचा काही साध्या क्लृप्त्या

  • Share this:

तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल किती जरी सजग असला, तरी भेसळयुक्त अन्नाचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहचत असते. मग तुमचे कितीही हेल्थ कोन्शिअस असणे निरुपयोगी आहे. हे भेसळयुक्त अन्नपदार्थ तुमच्या शरीराला हळूहळू नकळत इजा पोहचवत राहतात.आणि तुम्हाला कळत देखील नाही. सध्या बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात येत आहेत. तर या भेसळयुक्त पदार्थांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आणि कसे ओळखावे भेसळयुक्त पदार्थ यासाठी खालील गोष्ट नक्की वाचा...

1 ) मध-  अनेकांना सकाळी औषध म्हणून मधा चाटायची सवय असते. मात्र हे मध भेसळयुक्त तर नाही ना, हे ओळखण्यासाठी मधाचा एक थेंब आपल्या अंगठ्याच्या आणि बोटाच्या मध्यभागी घ्या बोटाने दाबून पाहा. तार येते का हे पाहा. ही तार जर जाड आणि घट्ट स्वरुपात दिसत असेल, तर मध शुद्ध आहे असं समजावं. मात्र मधाची पातळ तार बांधली जात असेल आणि मध हातावर पसरत असेल तर समजून जा की हे मध भेसळयुक्त आहे.

2) लाल मिरची पावडर- आपल्या रोजच्या वापरात असणारी मिरची पूडसुद्धा भेसळयुक्त असू शकते. त्यासाठी एका बाऊल मध्ये थोडं पाणी घ्या आणि त्यात थोडीशी मिर्ची पूड टाका, मिर्ची पूड जर पाण्यावर तरंगत असेल तर ती शुद्ध आहे. आणि जर पाण्यात बुडाली तर ती भेसळयुक्त समजली जाते.

3) दूध – शुद्ध प्रतीचं दूध ओळखायचं असेल तर, एखद्या दगडासारख्या गोष्टीवर दुधाचे काही थेंब टाका. त्यानंतर दुध जर वाहून गेल, आणि त्यावर पांढरे डाग राहिले तर दुध शुद्ध आहे. मात्र जर पिवळ्या रंगाचे डाग दिसत असतील तर दुध भेसळयुक्त आहे. त्याचबरोबर दुधात डीटर्जनचा वास येत असेल तर ते दूधसुद्धा भेसळयुक्त मानलं जातं.

4) तांदूळ – तांदळामध्ये सुद्धा मोठ्या भेसळ दिसून येते. जे तांदूळ भेसळयुक्त असतात त्यात एक प्रकारची चकाकी असते. जी नैसर्गिक तांदळात कमी असते. त्याचबरोबर नकली तांदूळ एकाच मापाचे असतात, मात्र जे शुद्ध ओरिजनल तांदूळ असतात ते वेगवेगळ्या आकाराचे असतात.

(हे पहा ;Organic Skincare किती फायदेशीर? जाणून त्याचे 5 गैरसमज!)

5) हिरव्या पालेभाज्या – बाजारातून आणलेल्या हिव्यागार पालेभाज्या भेसळयुक्त आहेत का ओळखण्यासाठी त्या पालेभाज्या काही वेळासाठी पाण्यात घालून ठेवा त्यातून जर हिरवा रंग निघत असेल तर त्या भेसळयुक्त आहेत असं समजावं .

6) धने पूड- धने पूडची शुद्धता तपासण्यासाठी चिमुटभर धनेपूड पाण्यात सोडा पूड जर पाण्यावर तरंगत असेल तर ती अगदी भेसळयुक्त आहे.

 7 ) चहापूड - चहापूड तपासण्यासाठी एक पांढऱ्या रंगाचा कागद घेऊन त्यावर चहापूड हाताने रगडा जर त्याचा रंग कागदावर लागत असेल तर समजावे ही चहापूड भेसळयुक्त आहे.

(टीप-News 18 लोकमत याची पुष्टी नाही करत. ही सर्व माहिती सर्वसामान्य निरीक्षणांच्या आधारे देण्यात आली आहे. तरीही यासंदर्भात जाणकारांची मदत घ्यावी.)

Published by: Aiman Desai
First published: February 28, 2021, 7:38 AM IST

ताज्या बातम्या