भारतातील सर्वात मोठी मारूती सुझुकीने आपल्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहे. यात कॅश डिस्काउंटसह एक्सचेंजचा फायदा सुद्धा मिळणार आहे. यातील सर्व मॉडेल हे कंपनीच्या Arena डीलरशिपवर सुद्धा उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी डिझायर फेसलिफ्ट - सप्टेंबर महिन्यात आपण जर या कारला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारवर 37,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यात 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, 25,000 रुपये का एक्सचेंज बोनस आणि 2,000 रुपये इतका कॉर्पोरेट बोनस मिळेल.
मारूती सुजुकी एस-प्रेसो : या गाडीवर तुम्हाला 43 हजारापर्यंत सूट देण्यात येत आहे. यात 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला आहे. त्या शिवाय 20 हजार रुपये एक्सचेंज बेनेफिट आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.
मारूती सुझुकी सेलेरियो - मारुतीच्या या गाडीवर 48,000 रुपये डिस्काउंट देत आहे. यात तुम्हाला 25 हजार रुपये कॅश डिस्काउंट कंपनीकडून ऑफर करण्यात आला आहे. या शिवाय 20,000 रुपये एक्सचेंज बोनस सुद्धा दिला जात आहे. 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे.
मारूती सुझुकी स्विफ्ट - मारुतीची सर्वात फेव्हरेट असलेल्या स्विफ्टवर जवळपास 37,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात 15,000 रुपये कॅश डिस्काउंट दिला जात आहे. तर 20,000 रुपये एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. यासह 2000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे.